प्रश्‍नपत्रिकेतील चुकांमुळे "पेट'चा निकाल लांबला ! 30 ऑगस्टला निकाल Canva
एज्युकेशन जॉब्स

प्रश्‍नपत्रिकेतील चुकांमुळे 'पेट'चा निकाल लांबला !

प्रश्‍नपत्रिकेतील चुकांमुळे "पेट'चा निकाल लांबला !

तात्या लांडगे

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात विविध विषयांतून पीएचडीच्या 644 जागांसाठी पेट परीक्षा पार पडली. मात्र, प्रश्‍नपत्रिकेतील चुकांमुळे हा निकाल लांबणीवर पडला.

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात (Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University) विविध विषयांतून पीएचडीच्या (PhD) 644 जागांसाठी पेट परीक्षा पार पडली. मात्र, प्रश्‍नपत्रिकेतील चुकांमुळे हा निकाल लांबणीवर पडला असून, काही उमेदवारांनी त्यासंदर्भात आक्षेप नोंदविले आहेत. त्यामुळे 'पेट' (PET)चा (PhD Entrance Test) निकाल 30 ऑगस्ट रोजी जाहीर होईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने दिली.

पीएचडीसाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद यासह अन्य काही विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडे अर्ज केले आहेत. जवळपास दोन हजार 700 अर्ज प्राप्त झाले असून त्यात बहुतेक उमेदवार प्राध्यापक आहेत. दरम्यान, विज्ञान आणि कन्नड विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत त्रुटी आहेत. इंग्रजी विषयाच्या प्रश्‍नांचे भाषांतर चुकल्याचाही काही उमेदवारांचा आक्षेप आहे. तो आक्षेप दूर करून "पेट'चा निकाल जाहीर होईल. त्यानंतर विषयनिहाय गुणवत्ता यादी लावली जाणार आहे. गुणवत्ता यादी आणि आरक्षणानुसार एका जागेसाठी तीन उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. तत्पूर्वी, "पेट' सवलत घेतलेल्या सेट-नेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह पेट परीक्षा दिलेल्यांची मेरिट यादी जाहीर होईल. प्रत्येक विषयातील उमेदवारांची निवड करण्यासाठी संबंधित विषयाचे अधिष्ठाता, विभागप्रमुख यांची समिती असणार आहे. उमेदवारांची निवड अंतिम झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.

पीएचडी प्रवेशपूर्व चाचणी (पेट) पार पडली, परंतु उमेदवारांना काही प्रश्‍नांबद्दल आक्षेप आहेत. त्यासंदर्भात संबंधित विषय प्रमुखांना पत्र पाठवून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. 30 ऑगस्टला निकाल जाहीर करून 15 सप्टेंबरपासून मुलाखती सुरू होतील.

- डॉ. विकास कदम, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

राखीव जागेत 'या' उमेदवारांनाही संधी

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना "पीएचडी'साठी 90 टक्‍के जागा राखीव असतात. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तशा मार्गदर्शक सूचना आहेत. परंतु, एखाद्या विद्यार्थ्याने अन्य विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले असेल आणि तो सोलापूर जिल्ह्याचा रहिवासी असल्यास त्यालाही या राखीव कोट्यातून प्रवेश मिळणार आहे. त्यासाठी त्या उमेदवाराकडे सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे आधार कार्ड असायला हवे. दुसऱ्या विद्यापीठातील सर्वाधिक अर्ज असल्याने कोणाची निवड होणार, याची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT