एज्युकेशन जॉब्स

परीक्षा, मुलाखतीचं आता 'नो टेन्शन'; पोस्टात 4845 पदांवर थेट भरती

बाळकृष्ण मधाळे

उत्तर प्रदेश पोस्टल सर्कल आणि उत्तराखंड पोस्टल सर्कलमध्ये ग्रामीण डाक सेवकाच्या पदांकरिता भरतीसाठी अर्ज प्रक्रिया नुकतीच सुरू झालीय.

India Post GDS Recruitment 2021 : उत्तर प्रदेश पोस्टल सर्कल आणि भारतीय पोस्टल विभागाच्या उत्तराखंड पोस्टल सर्कलमध्ये ग्रामीण डाक सेवकाच्या (GDS) हजारो पदांकरिता भरतीसाठी अर्ज प्रक्रिया नुकतीच सुरू झालीय. दहावीतील उत्तीर्ण उमेदवार, या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांकरिता इच्छुक उमेदवार पोस्टाच्या अधिकृत वेबसाइटव्दारेही appost.in ऑनलाइन अर्ज भरु शकतात. दरम्यान, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2021 आहे.

कोणत्या पोस्टल सर्कलमध्ये किती जागा?

  • उत्तर प्रदेश पोस्टल सर्कलमधील पदांची संख्या - 4264

  • उत्तराखंड पोस्टल सर्कलमधील पदांची संख्या - 581

  • दोन्ही राज्यांमध्ये एकूण पदांची संख्या - 4845

GDS Vacancy 2021 : शैक्षणिक पात्रता

टपाल विभागात ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था / बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. या भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही, परंतु 10 वीच्या गुणांच्या आधारे त्यांची निवड केली जाईल.

Postal Circle GDS Recruitment 2021 : वयोमर्यादा

पोस्ट विभागात जीडीएसच्या पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय पदांनुसार 40 वर्षे आहे. मात्र, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार शिथिलता दिली जाईल.

GDS Vacancy 2021 : अर्ज शुल्क

या पदांवर अर्ज करण्यासाठी सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस श्रेणीतील पुरुष उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी / एसटी आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे.

अर्ज कसा करावा?

भारतीय पोस्टल विभागाच्या उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश सर्कलमध्ये GDS च्या पदांकरिता अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला appost.in भेट द्यावी लागेल. तर, अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2021 आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT