NEET PG Exams Updates Sakal
एज्युकेशन जॉब्स

NEET-UG 2022 : परीक्षा पुढे ढकलण्यासाठी दिल्ली हाय कोर्टात याचिका

सकाळ डिजिटल टीम

NEET-UG 2022 : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET-UG) पुढे ढकलण्याची मागणी वाढतच चालली आहे. विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी आता वैद्यकीय प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. NEET पुढे ढकलण्याव्यतिरिक्त, वकील ममता शर्मा यांनी दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत NEET-UG2022 परीक्षेसाठी अतिरिक्त संधी देण्याची मागणी केली होती. दरम्यान न्यायालय या प्रकरणाची उद्या तातडीने सुनावणी घेईल अशी अपेक्षा आहे.

दरम्यान ही NEET-UG 2022 येत्या 17 जुलै रोजी होणार आहे, ज्याची अॅडमीट कार्ड काल neet.nta.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर विद्यार्थ्यांकडून मागणी केली जात आहे, मोठ्या संख्येने विद्यार्थी सोशल मीडियावर NEET UG पुढे ढकलण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. विद्यार्थ्यांनी ट्विटरवर #NEETUG2022Postponement आणि #PostponeNEETUG2022 या नावांनी हॅशटॅग देखील चालवले आहेत. NEET आणि CUET या परीक्षा एकाच वेळी घेतल्या जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठीही वेळ मिळालेला नसल्याबद्दल देखील तक्रार करण्यात येत आहे.

परीक्षा पुढे ढकलणार का?

सध्याची परिस्थिती पाहता NEET परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता कमी आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. परीक्षेसाठीचे अॅडमीट कार्ड देखील देण्यात आले आहेत. याशिवाय केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही काही दिवसांपूर्वी याकडे लक्ष वेधले होते. ते म्हणाले होते की बहुतेक विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी केली आहे आणि ते परीक्षेलाही बसत आहेत. NTA ने आपल्या नोटीसमध्ये असेही म्हटले आहे की NEET परीक्षा CUET परीक्षेच्या तारखा लक्षात घेऊन आयोजित केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : गोकुळ अध्यक्षपदाच्या फोडाफोडीच्या चर्चांदरम्यान सतेज पाटलांची भूमिका स्पष्ट; मुश्रीफ, विनय कोरे, चंद्रकांतदादा आणि चंद्रदीप नरके यांच्याशी चर्चा

IND vs NZ 3rd T20I: टीम इंडियाला Live सामन्यात धक्का, मॅचविनर फलंदाजाने सोडले मैदान; बदली खेळाडू आला, नेमकं काय घडलं?

लाडकी बहीणनंतर 'लाडकी विद्यार्थिनी योजना', ६,००० रुपये मिळणार; महायुती सरकारची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईक यांची आघाडी कायम; पहिल्या फेरीत मोठी मुसंडी

सोशल मीडियावर २० लाख फॉलोअर्स, गावच्या निवडणुकीत फक्त ३३ मतं; युट्यूबरला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT