Exam  esakal
एज्युकेशन जॉब्स

दहावी-बारावीचे प्रात्यक्षिक सुरु! परीक्षेसाठी एका वर्गात 25 विद्यार्थी

लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिकांचे काम पूर्ण केले जात आहे.

तात्या लांडगे

लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिकांचे काम पूर्ण केले जात आहे.

सोलापूर : कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेमुळे शाळा बंद झाल्यानंतर दहावी-बारावीच्या (SSC-HSC) 50 टक्‍के विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांचे अंतर्गत मूल्यमापन करुन घेण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर (Bhaskar Babar) यांनी काढले. लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिकांचे काम (Practical Exam) पूर्ण केले जात आहे.

कोरोनाचा (Corona) संसर्ग जानेवारीत वाढल्यानंतर राज्य सरकारने (State Government) शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. परंतु, दहावी-बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार असल्याने बहुतेक शाळा, महाविद्यालयांचा अभ्यासक्रम मागे राहिला होता. ऑनलाइन शिक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना फारसे न समजल्याने तो पुन्हा शिकवला जात आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे वर्ग काही तासांसाठी ऑफलाइन सुरु आहेत. आता अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असून त्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक घेतले जात आहे. त्यासाठी एकूण पटसंख्येच्या 50 टक्‍के विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात बोलावले जात आहे. बोर्डाच्या वेळापत्रकानुसार बारावीचे प्रात्यक्षिक 14 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत होणार आहे. तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत घेण्याचे बोर्डाने निश्‍चित केले. तरीही, सध्या कोरोनामुळे सर्वच विद्यार्थ्यांना त्यावेळी बोलावणे कठीण असल्याने आतापासूनच प्रात्यक्षिकाचे (Practical Exam) काम सुरु करण्यात आले आहे. सध्या शाळा बंद असल्या तरीही 100 शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याचे बंधन घालण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन (प्रात्यक्षिक) करताना त्यांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे, असेही माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना बजावले आहे.

कोरोनाचे नियम पाळून दहावी-बारावीचे ऑनलाइन तास घेतले जात आहेत. 50 टक्‍के उपस्थितीत त्यांचे अंतर्गत मूल्यमापन सुरु आहे. जिल्ह्यातील जवळपास सव्वालाख विद्यार्थी बोर्डाची परीक्षा देतील. अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असून विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास, त्या सोडविण्याच्या सूचना मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षकांना केल्या आहेत.

- भास्कर बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

एका बेंचवर असेल एकच विद्यार्थी

15 वर्षांवरील मुलांना कोरोनावरील प्रतिबंधित लस टोचली जात आहे. लेखी परीक्षेपूर्वी त्यांचा दुसराही डोस पूर्ण होईल. परीक्षेच्या हॉलमध्ये एका वर्गात 25 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था असणार आहे. जिल्ह्यात काही परीक्षा केंद्रे वाढतील, असाही अंदाज वर्तविला जात आहे. बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल तर दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल यावेळी नियोजित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT