Prasar Bharati Recruitment 2022 Sakal
एज्युकेशन जॉब्स

​​Prasar Bharati ​Jobs: विविध पदांसाठी भरती; पात्रता जाणून घ्या

Prasar Bharati Recruitment 2022: प्रसार भारतीमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Prasar Bharati Recruitment 2022: प्रसार भारती मधील नोकरी (Job) शोधणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. दूरदर्शन (Doordarshan) न्यूज लखनऊ मध्ये कॉन्ट्रॅक्ट आधारावर कंटेंट एक्झिक्युटिव्ह, व्हिडिओ पोस्ट प्रोडक्शन असिस्टंट, पॅकेजिंग असिस्टंट, ब्रॉडकास्ट एक्झिक्युटिव्ह, बुलेटिन एडिटर आणि इतर पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी प्रसारभारतीने ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. या प्रत्येक पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वेगवेगळी आहे, त्यासाठी उमेदवार https://prasarbharati.gov.in/ या अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात. या भरतीअंतर्गत एकूण २७ पदे भरण्यात येणार आहेत.

पात्रता निकष (Prasar Bharati Recruitment 2022 Eligibility Criteria)-

उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पत्रकारितेतील पदवी किंवा पीजी डिप्लोमा पूर्ण केलेला असावा तसेच हिंदी आणि इंग्रजीवर उमेदवाराचं प्राविण्य असावे. उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील २ वर्षांचा अनुभवासोबतच चित्रपट आणि व्हिडिओ संपादनाचा व्यावसायिक डिप्लोमा आणि Adobe Premiere आणि FCP वर काम करण्याचा अनुभव असावा.

वयोमर्यादा (Prasar Bharati Recruitment 2022 Age Limit)-

उमेदवारांची किमान वयोमर्यादा 30 वर्षे ते कमाल वयोमर्यादा 45 वर्षांपेक्षा जास्त नसावी.

निवड प्रक्रिया (Prasar Bharati Recruitment 2022 Selection Process)-

पात्रता निकष आणि सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणारे उमेदवार दूरदर्शन केंद्र लखनऊ येथे मुलाखत आणि कौशल्य चाचणीसाठी निवडले जातील.

असा करा अर्ज (Prasar Bharati Recruitment 2022 Apply in this way)-

इच्छुक आणि पात्र उमेदवार डीडी न्यूज, दूरदर्शन केंद्र, 24 अशोक मार्ग, लखनौ, पिन कोड - 226001 येथे होणाऱ्या मुलाखतीसाठी (अर्ज क्रमांकासह) उपस्थित राहू शकतात. या दरम्यान, उमेदवारांना त्यांच्यासोबत सर्व संबंधित कागदपत्रे आणावी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivdeep Lande contest Bihar Election: ‘सिंघम’ शिवदीप लांडे यांचीही आता बिहारच्या निवडणूक रिंगणात उडी; उमेदवारी अर्ज दाखल करणार!

EPFO New Option : 'ईपीएफओ' सदस्यांना मिळाला नवा पर्याय! आता 'PF' रक्कम पेन्शन खात्यात वळवता येणार

ब्रेकिंग! साहेबांच्या नावाने लाच मागणारा एजंट ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात; मयताच्या भावाकडे, पत्नीकडे पीएफ, पेन्शन काढून देण्यासाठी मागितले २५००० रुपये

Ajit Pawar : जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी करण्याचे उपमुख्यमंत्री पवार यांचे आदेश

Supreme Court : मृत्युदंडाच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्रावर नाराजी

SCROLL FOR NEXT