Prasar Bharati Recruitment 2022 Sakal
एज्युकेशन जॉब्स

प्रसार भारतीमध्ये २५००० हून अधिक पदे रिक्त!

संसदीय समितीने दूरदर्शन आणि आकाशवाणीतील रिक्त जागा भरण्यास सांगितले आहे

सकाळ डिजिटल टीम

सध्या प्रसार भारतीमध्ये 25,188 जागा रिक्त आहेत, त्यापैकी 9,869 जागा दूरदर्शनमध्ये आणि 15,319 आकाशवाणीमध्ये आहेत. संसदेत सादर करण्यात आलेल्या दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानावरील स्थायी समितीच्या 34व्या अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रसार भारतीमधील 25,188 रिक्त पदांबाबत एका संसदीय समितीने कठोर भूमिका घेतली आहे. या समितीने म्हटले आहे की, माहिती आणि प्रसारण मंत्रालयांकडे वारंवार शिफारस करूनही रिक्त पदांमध्ये फक्त 2,855 पदांची वाढ झाली आहे.

अहवालानुसार, मनुष्यबळाच्या अभावामुळे संस्था आणि क्षमतेवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून संसदीय समितीने मंत्रालयाला अधिक वेळ न घालवता प्रसार भारतीतील रिक्त पदे भरण्यासाठी ठोस पावले उचलण्याची विनंती केली आहे. त्यात म्हटले आहे की, 2021-22 या वर्षाच्या अहवालाचा आढावा घेतल्यावर मंत्रालायने दूरदर्शन आणि आकाशवाणीमध्ये अनुक्रमे 10,247 आणि 12,086 रिक्त जागा असल्याचे सूचित केले होते.

रिक्त पदे भरण्यासाठी वारंवार शिफारसी करूनही फक्त 2,855 पदे भरण्यात भरण्यात आली. त्यामुळे त्याची दखल घेतल्याचे समितीने म्हटले आहे. याचे कारण विचारले असता मंत्रालयाने, आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या रिक्त जागा भरणअयासाठी प्रसार भारती भर्ती मंडळाची स्थापना 1 जुलै 2020 रोजी करण्यात आली, असे सांगितले. त्यानुसार आता लवकरच जागा निघणार असून https://prasarbharati.gov.in/ या वेबसाईटवर तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT