शिक्षक sakal
एज्युकेशन जॉब्स

'प्राथमिक' शिक्षकांना दिवाळीची 16 दिवसच सुटी! 'माध्यमिक'ला 20 दिवस

'प्राथमिक'च्या शिक्षकांना दिवाळीची 16 दिवसच सुटी! 'माध्यमिक'ला 20 दिवस

श्रीनिवास दुध्याल

माध्यमिक शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्या या 76 दिवसांपेक्षा अधिक होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

सोलापूर : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना (School) दिवाळीनिमित्त (Diwali) 1 ते 20 नोव्हेंबरपर्यंत सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. परंतु, प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना (Teachers) 1 ते 16 नोव्हेंबरपर्यंतच सुटी राहील, असे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. तर माध्यमिक शाळांमधील शिक्षकांना 1 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत सुटी राहील, असे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये दिवाळी सुटीनंतर 22 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळी सुटीबाबत जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकीय, अशासकीय प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालये, सैनिकी शाळांना सुट्यांसंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. शिक्षकांना दरवर्षी शासनाकडून 76 सुट्या दिल्या जातात. यंदाच्या दिवाळीसाठी जाहीर केलेल्या सुट्या सर्व शिक्षकांनी त्याच दिवशी घ्यायच्या आहेत. त्यात कोणताही बदल होणार नसून सुट्यांमध्ये बदल करण्याची कोणालाही परवानगी नसेल, असेही नमूद करण्यात आले आहे. परंतु, ज्या जिल्ह्यातील शिक्षकांना यापूर्वी विविध सण-उत्सवानिमित्त सुट्या देण्यात आल्या आहेत, त्यांच्या सुट्या मात्र कमी असणार आहेत. माध्यमिक शाळा संहितेनुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्या या 76 दिवसांपेक्षा अधिक होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

दिवाळीनिमित्त प्राथमिक शिक्षकांना 25 ऑक्‍टोबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीत सुटी देण्याचे नियोजन होते. परंतु, त्यात बदल करून आता 1 ते 16 नोव्हेंबर या काळात जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षकांना सुटी दिली आहे.

- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

22 नोव्हेंबरपासून प्राथमिक शाळांचा मुहूर्त?

कोरोनाच्या संकटामुळे मार्च 2020 पासून राज्यातील प्राथमिक शाळा उघडलेल्या नाहीत. शाळा बंद असल्याने लहान मुलांचा शैक्षणिक पाया कमकुवत झाला आहे. शिक्षणाचा पाया मजबूत झाला तरच ही मुले स्पर्धेत टिकू शकणार आहेत, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. ऑनलाइन शिक्षण सुरू झाल्यानंतर सुरवातीला जेवढी संख्या होती, त्यात विविध कारणांमुळे खूप मोठी घट झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोनाची परिस्थिती पाहून 22 नोव्हेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Forecast : 500 मिमीवरून पाऊस थेट शून्यावर! पुणे, कोकण आणि घाटमाथ्यावरील पावसाला अचानक का लागला ब्रेक? 'आयएमडी'ने दिले स्पष्टीकरण

Pune Water Supply Update : पुणेकरांना दिलासा ! पाणी कपातीचे संकट तूर्तास टळले; खडकवासला धरणात समाधानकारक साठा

Latest Marathi News Update : पावसाअभावी कपाशी संकटात; कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली

भाईजान गॅलेक्सी अपार्टमेंट सोडणार? सलमान खानने विकली वांद्र्यातील प्रॉपर्टी, कोट्यवधींची डील

Pune Rainfall : पुण्यावर वरुणराजाची कृपेची सावली! मुळशी, पवना, खडकवासल्यात मागील वर्षापेक्षा अधिक पाऊस; धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही समाधानकारक पर्जन्यमान, ताजी आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT