Sarkari Naukri
Sarkari Naukri esakal
एज्युकेशन जॉब्स

PSSSB मध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी; 'या' पदांसाठी 2789 जागा भरणार

सकाळ डिजिटल टीम

Clerk पदांकरिता सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे.

Sarkari Naukri 2021, PSSSB Clerk Recruitment 2021 : Clerk पदाकरिता सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी! पंजाब सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डने (PSSSB) लिपिक भरतीसाठी नुकतीच अधिसूचना जारी केलीय. या पदांकरिता अडीच हजाराहून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार PSSSB च्या अधिकृत वेबसाइटवर sssb.punjab.gov.in आपला ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

महत्वाच्या तारखा आणि पगार

PSSSB लिपिक भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2021 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, तर आयटी लिपिक आणि लिपिक लेखा पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2021 पर्यंत आहे. लिपिक पदांसाठी वेतन 19900 रुपये (वेतन स्तर-2) असणार आहे.

रिक्त जागा

लिपिक - 2374 पदे

लिपिक आयटी - 213 पदे

लिपिक खाते - 203 पदे

एकूण रिक्त पदांची संख्या - 2789 पदे

कोण अर्ज करू शकतो?

1 जानेवारी 2021 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे, तर कमाल वयोमर्यादा 37 वर्षे असावी. नियमानुसार वयात काही सूट दिली जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. शिवाय, अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने प्रत्येक पदांसाठी पात्रता निकष तपासून घ्यावेत.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि टायपिंग चाचणीच्या आधारे PSSSB लिपिक पदासाठी उमेदवारांची निवड केली जाईल.

ऑनलाइन अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटच्या sssb.punjab.gov.in मुख्यपेजवरील 'करंट न्यूज' विभागात जा. येथे Clerk (Advt. 17/2021), Clerk IT (18/2021) किंवा Clerk Accounts (19/2021) या लिंकवर क्लिक करा. आता एक नवीन विंडो उघडेल, ज्या पोस्टवर तुम्हाला अर्ज करायचाय, त्या लिंकवर क्लिक करा आणि ऑनलाइन अर्ज, फी भरा. अर्जात संपूर्ण माहिती भरुन झाल्यावर अर्ज सबमिट करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT