quad google
एज्युकेशन जॉब्स

UPSCमध्ये विचारला जाऊ शकतो हा प्रश्न.... तुम्ही उत्तराची तयारी केलीय का ?

क्वाड म्हणजे क्वाड्रीलेटरल सिक्योरिटी डायलॉग (QUAD). यूएस, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान यांचे हे संयुक्त व्यासपीठ आहे.

नमिता धुरी

मुंबई : २४ मे २०२२ रोजी जपानच्या टोकियोमध्ये क्वाड लीडर्स शिखर संमेलन आयोजित करण्यात आले होते. यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते. त्यामुळे यंदाच्या UPSCच्या परीक्षेत याविषयी प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे.

क्वाड म्हणजे काय ?

क्वाड म्हणजे क्वाड्रीलेटरल सिक्योरिटी डायलॉग (QUAD). यूएस, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान यांचे हे संयुक्त व्यासपीठ आहे. स्वतंत्र, खुल्या, समृद्ध आणि समावेशक अशा इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी काम करणे हे क्वाडचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. या समूहाची पहिली बैठक २००७ साली झाली होती. बैठका, अर्धनियमित शिखर संमेलने, सूचनांचे आदान-प्रदान आणि सैन्य अभ्यास यांद्वारे या समूहाचे कामकाज चालते.

क्वाडची स्थापना कधी झाली ?

२००७ साली जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान जॉन हावर्ड यांच्या पुढाकाराने क्वाडची स्थापना झाली. २००४ साली जपानमध्ये त्सुनामी आल्यानंतर भारताने आपल्या आणि शेजारील राष्ट्रांच्या नागरिकांसाठी जे मदतकार्य केले होते त्यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानही सामील झाले होते. तेव्हाच खरेतर क्वाडची संकल्पना पुढे आली होती. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात समुद्री मार्गाने व्यापार सुकर करणे हा क्वाडचा प्राथमिक उद्देश आहे.

क्वाडचे सिद्धांत

समुद्रमार्गे व्यापार सुरळीत करणे हा क्वाडचा उद्देश आहेच; शिवाय चीनचे वर्चस्व कमी करणे हाही उद्देश आहे. तसेच ग्लोबल ऑर्डर, नेव्हिगेशनचे स्वातंत्र्य आणि उदार व्यापार प्रणाली यांचे संरक्षण करण्याचाही उद्देश आहे. हे व्यासपीठ हिंद-प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी पर्यायी कर्जही देऊ करते. क्वाडचे नेता तंत्रज्ञान, वातावरण बदल, शिक्षण, इत्यादी समकालीन वैश्विक मुद्द्यांवरही विचारमंथन करतात.

भारताला लाभ कसा ?

क्वाड ही चीनच्या वाढत्या आर्थिक आणि लष्करी वर्चस्वाविरोधातील रणनीति आहे. चीनने भारतावर पकड घेण्याचा प्रयत्न केल्यास भारत इतर क्वाड राष्ट्रांचा पाठिंबा मिळवू शकतो. तसेच हिंद-प्रशांत महासागरातही रणनीती आखता येऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिषेक बॅनर्जी हल्ला प्रकरणाला वेगळं वळण, TMC आमदाराचे निकटवर्तीयच हल्लेखोर

NIA Deputy SP Accident: भरधाव दुचाकीची कंटेनरला धडक; राष्ट्रीय तपास संस्थेच्या उपअधीक्षकांचा दुर्दैवी मृत्यू; प्रेयसी गंभीर जखमी

"‘तू मेरा दिल, तू मेरी जान’ म्हणत रियान परागची उदास वैभव सूर्यवंशीला जादू की झप्पी; Video Viral, एकदा नक्की पाहाच नेमकं काय घडल?"

Yavatmal: पत्नीच्या खुनात पतीला सश्रम कारावास; बीएनएसस कायद्यांतर्गत प्रकरण निकाली; तक्रारीचे अभिलेख ठरले महत्वाचे

Yavatmal: पीककर्ज वाटपाची गती मंदावली; आतापर्यंत 21 टक्के वाटप; दोन हजार 200 कोटीचे उदिष्ट

SCROLL FOR NEXT