एज्युकेशन जॉब्स

वाटा करिअरच्या..: तयारी परदेशी शिक्षणासाठी...

राजीव बोस

आपले भविष्य तंत्रज्ञानावरच अवलंबून असेल, याबद्दल कोणतीही शंका नाही. प्रत्येकच क्षेत्रात कॉम्प्युटर सायन्सचा झालेला प्रवेश पाहता, नव्या बदलांना सामोरे जाण्यासाठी योग्य शिक्षण निवडण्याला पर्याय नाही. संशोधन आणि विकास देशाच्या भरभराटीचे दोन स्तंभ आहेत. मात्र, या सगळ्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज लागते व ते उपलब्ध होणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. या परिस्थितीत कष्ट घेणाऱ्या आणि पुढे जाण्याची तीव्र इच्छा असणाऱ्या हुशार मुलांसाठी परदेशात शिक्षण घेण्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. 

पदवी अभ्यासक्रमातून पाया पक्का झाल्यानंतर विद्यार्थी उच्चशिक्षण घेण्यासाठी तयार होतो. तुमचे ध्येय तुमच्या मनात पक्के असल्यास हे साध्य करता येते. आपली महत्त्वाकांक्षा आणि क्षमता यांचा विचार करून विद्यार्थी पुढील शिक्षणासाठीचे विद्यापीठ निवडतात. अभ्यासक्रम अधिकाधिक गुंतागुंतीचे आणि व्यावसायिक होत असल्याने त्यासाठी आवश्यक सुविधा व फॅकल्टीला (शिक्षक) मोठे महत्त्व प्राप्त होते. उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला नॅनोटेक्नॉलॉजीमधील उच्चशिक्षण घ्यायचे असल्यास त्याला अतिशय अद्ययावत लॅबोरेटरी सुविधा व त्याचबरोबर या क्षेत्रातील सखोल ज्ञान असलेल्या  विख्यात शिक्षकांची गरज अनिवार्य ठरते. या परिस्थितीत सुयोग्य विद्यापीठाची निवड करताना अनेक घटकांचा विचार करावा लागतो, तसेच अनेक नव्या गोष्टींची माहितीही करून घ्यावी लागत असल्याने हे काम अधिक कठीण बनते. 

त्यामुळे परदेशातील शिक्षण हा आता केवळ स्वप्न न राहता वस्तुस्थिती बनली असले, तरी त्यासाठी भरपूर चर्चा व विचारविनिमयाची गरज पडते. त्यातील महत्त्वाच्या पायऱ्या आहेत

  भविष्यासाठीचे तुमचे ध्येय निश्चित हवे.
  सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे.
 उच्च शिक्षणासाठीच्या सुयोग्य ठिकाणाची 
निवड करणे.
 त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक पैशांची 
तरतूद करणे.
 उच्च शिक्षणानंतर चांगली नोकरी मिळविणे.

(लेखक परदेशी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde: भाजप सरकारचा स्मार्ट मीटर कायदा अदानींचा फायदा : खासदार प्रणिती शिंदे; जनतेसाठी रस्त्यावर उतरावे लागणार

Satara Crime: सातारा हादरला! 'चिकन 65 फुकट न दिल्याने दगडफेक'; 10 जणांवर गुन्हा, दोन हल्‍लेखोर ताब्‍यात

ऑनर किलिंगने हादरलं सूर्यापेट! आंतरजातीय प्रेमविवाहामुळे युवकाची क्रूरपणे हत्या; पत्नी म्हणाली, 'मी स्वप्नातही देखील..'

Latest Marathi News Updates : जयशंकर यांनी सिंगापूर दौऱ्यात विवान बालकृष्ण यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये आर्थिक संबंधावर चर्चा

Satara Crime: 'वेळेनजीक सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला लुटले; वीस लाख लंपास, अपहरण करून पाय बांधले अन्..

SCROLL FOR NEXT