Reserve Bank of India esakal
एज्युकेशन जॉब्स

रिझर्व्ह बँकेच्या 'या' परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; असा पहा Result

सकाळ डिजिटल टीम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नुकताच भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केलाय.

RBI Office Attendant Result 2021-22 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) नुकताच भरती परीक्षेचा (Office Attendant Result) अंतिम निकाल जाहीर केलाय. या परीक्षेला बसलेले उमेदवार RBI- rbi.org.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल (RBI Office Attendant Result 2021) पाहू शकतात. ही परीक्षा एकूण 841 पदांच्या भरतीसाठी घेण्यात आली होती. दरम्यान, निवडलेल्या उमेदवारांची यादी RBI च्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आलीय. 24 फेब्रुवारी 2021 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank of India) ऑफिस अटेंडंट पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती.

RBI नं जाहीर केलेल्या या पदांसाठी अर्ज भरण्याकरता उमेदवारांना 15 मार्च 2021 पर्यंत वेळ देण्यात आली होती. ही परीक्षा 9 आणि 10 एप्रिल 2021 रोजी घेण्यात आली. या परीक्षेला बसलेले उमेदवार (RBI Office Attendant Exam 2021) अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आपला निकाल (RBI Office Attendant Result 2021) पाहू शकतात.

असा पाहा निकाल

  • सर्वप्रथम RBI- rbi.org.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • आता वेबसाइटच्या होम पेजवर जाऊन VACANCIES विभागावर क्लिक करा.

  • त्यानंतर Result वर क्लिक करा.

  • आता एक PDF फाईल उघडेल.

  • तुम्ही तुमच्या रोल नंबरच्या मदतीनं या PDF मध्ये आपला निकाल पाहू शकता.

RBI च्या कार्यालयांत होणार नियुक्ती

या परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची विविध आरबीआय कार्यालयांमध्ये नियुक्ती केली जाईल. यामध्ये अहमदाबाद 50, बंगळुरू 28, भोपाळ 25, चंदीगड 31, चेन्नई 71, हैदराबाद 57, जयपूर 43, कानपूर 69, मुंबई 202, नागपूर 55 आणि नवी दिल्लीमध्ये 50 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

Supreme Court: प्रीमियम व्हिस्की खरेदी करणारे ग्राहक सुशिक्षित अन् जागरूक, सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं? प्रकरण काय?

Latest Marathi News Updates : नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात पुन्हा दोन गटात वाद

कोकणच्या लाल मातीत कोरला दशावतार, संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाची जोरदार चर्चा!

SCROLL FOR NEXT