एज्युकेशन जॉब्स

RCU Exam Results - परीक्षा संपल्या आता निकालाची प्रतिक्षा

सतीश जाधव

या निकालानंतरच पदवीच्या अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांची पदव्यूत्तरची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.

बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या पदवी आणि पदव्यूत्तरच्या मागील वर्षाच्या परीक्षा संपल्या आहेत. विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतिक्षा आहे. या निकालानंतरच पदवीच्या अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांची पदव्यूत्तरची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. यामुळे विद्यापीठाने लवकरात लवकर निकाल लावावा अशी मागणी होत आहे.

यंदा कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष लांबणीवर पडले आहे. महिनाभरापूर्वी पदवीच्या पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या तसेच पदव्यूत्तरच्या पहिल्या व तिसऱ्या सेमीस्टरच्या परीक्षा झाल्या होत्या. यातील पदवीच्या बी. ए, बी. कॉम व बी. एस्सीच्या काहींचा निकाल लागला आहे. तर पदव्यूत्तरच्या मागील परीक्षांचा निकाल अद्याप लागलेला नाही. नुकताच पदवीच्या दुसऱ्या व चौथ्या परीक्षा वगळता फक्त अंतीम वर्षाच्या परीक्षा झाल्या आहेत. त्या परीक्षांचा निकालही येत्या महिनाभरात लागण्याची शक्यता आहे.

अंतीम वर्षाच्या या परीक्षांचा निकाल लागल्यानंतर या विद्यार्थ्यांना पदव्यूत्तरसाठी प्रवेश मिळणार आहे. सध्या बंगळूर येथील महाविद्यालयात पदव्यूत्तरचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. येथील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे अशक्य बनले आहे. यामुळे पदवीचे मागील सेमीस्टरचे शिल्लक निकाल व नुकताच झालेल्या परीक्षांचे निकालही लवकर लावावेत अशी मागणी होत आहे.

पदव्यूत्तरच्या एम. ए. एम. कॉम, एम. एस्सी व आदींच्या महिनाभरापूर्वी झालेल्या प्रथम व तृतीय तसेच नुकताच झालेल्या अंतीम वर्षातील शेवटच्या परीक्षांचा निकालही अध्याप लावण्यात आलेला नाही. यामुळे विद्यापीठाने या परीक्षांचे निकाल लवकर लावावेत अशी मागणी विद्यार्थ्यांतून केली जात आहे.

"दोन दिवसांपासून पदवी महाविद्यालयांना सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. मागील सेमिस्टरचे निकाल टप्याटप्याने येत आहेत. नुकताच झालेल्या परीक्षांचेही निकाल लवकरच लागतील."

- प्रा. अशोक आलगोंडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Kolhapur-Sindhudurg Road : शिवडाव-सोनवडे घाटमार्गातील अंतिम अडसर दूर; केंद्रीय पर्यावरण समितीची मंजुरी, 13 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या कसा असणार नवा मार्ग

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

SCROLL FOR NEXT