Read NCERT books and succeed in competitive exams Nagpur news
Read NCERT books and succeed in competitive exams Nagpur news 
एज्युकेशन जॉब्स

UPSC Important Books : NCERT हे पुस्तकं वाचा आणि स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : पुस्तकांचे काय महत्त्व असते हे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना विचारा. ते एका एका पुस्तकासाठी किती संघर्ष करतात हे त्यांनाच ठाऊक असते. पुस्तकांशिवाय कोणताही अभ्यास पूर्ण होत नाही. कोणत्या विषयासाठी कोणते आणि पुस्तक घ्यावे हे महत्त्वाचे असते तसेच ते किती उपयोगाचे हेही तपासणे तितकेच महत्त्वाचे असते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांमध्ये विविध विद्याशाखेच्या विद्यार्थांचा समावेश असतो. त्यामुळे पुस्तकांची निवड करताना थोडा विचार करायलाच हवा.

आजच्या घडीला स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. कोणत्याही शाखेत पदवीधर, पदवृत्तर होऊन नोकरी करण्यापेक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जग आपल्या कवेत घेण्याचा विचार करूनच युवकांचा कल इकडे वळत चालला आहे. मात्र, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना कोणते पुस्तक घ्यावे, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत असतो.

कारण, पुस्तकांशिवाय अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही. तसेच योग्य पुस्तकातून अभ्यास केल्याशिवाय आपले चांगली परीक्षा देऊ शकत नाही. म्हणून नुसते अभ्यास करून चालत नाही तर योग्य पुस्तकाची निवड करणेही महत्त्वाचे आहे. एकदा स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवले की, सगळ्यात आधी अभ्यासक्रम वाचावा आणि त्यानुसार आपण पुस्तकांची यादी तयार करावी.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी एनसीईआरटीचे (National Council for Education Research and Training) पुस्तक फायदेशीर ठरतात. ही संस्था भारताच्या शिक्षणक्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारांना शिक्षणविषयक धोरणे ठरविण्यासाठी सल्ला देणे व सहाय करणे हे  संस्थेचे मुख्य कार्य आहे.

या संस्थेतर्फे प्रकाशित होणारी पुस्तके केंद्र सरकारच्या शाळांमध्ये वापरली जातात आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेला बसणारे विद्यार्थी याचा जास्त वापर करतात. याच पुस्तकातील प्रश्न परीक्षेत विचारली जातात. तेव्हा आपण कोणत्या पुस्तकाचा वापर करावा हे आज जाणून घेणार आहोत...

इतिहासाचे महत्त्वाचे पुस्तक

  • भूगोल
  • अर्थशास्त्र
  • राजनीती शास्त्र
  • समाजशास्त्र
  • ललित कला
  • विज्ञान

वर्गानुसार इतिहासाची महत्त्वाची पुस्तके

वर्ग पुस्तक
सहावा आमचा भूतकाळ १
सातवा आमचा भूतकाळ २
आठवा आमचा भूतकाळ ३, खंड १ आणि खंड २
नववा भारत आणि समकालीन जग १
दहावा भारत आणि समकालीन जग २
अकरावी जागतिक इतिहासाचे काही विषय (औद्योगिक क्रांती महत्त्वपूर्ण)
बारावी भारतीय इतिहासाचे काही विषय १, भारतीय इतिहासाचे काही विषय २, भारतीय इतिहासाचे काही विषय ३

भूगोलाचे पुस्तके

वर्ग पुस्तक
सहावा पृथ्वी: आमचा निवास
सातवा आपले पर्यावरण
आठवा संसाधने आणि विकास
नववा समकालीन भारत १
दहावा समकालीन भारत २
अकरावी भौतिक भूगोलाचे मूळ सिद्धांत, ११वी भारत-भौतिक पर्यावरण
बारावी मानवी भूगोलाची मूलभूत तत्त्वे, १२ वी भारत-लोक आणि  
अर्थव्यवस्था

अर्थशास्त्राची पुस्तके

वर्ग पुस्तक
नववा अर्थशास्त्र
दहावा आर्थिक विकास समजून घेणे
अकरावी भारती आर्थिक विकास
बारावी प्रारंभिक सूक्ष्म अर्थशास्त्र


राज्यशास्त्राची पुस्तके

वर्ग पुस्तक
नववा लोकशाही राजकीय १
दहावा लोकशाही राजकारण २
अकरावा राजकीय राज्यघटना, राजकीय सिद्धांत
बारावा समकालीन जागतिक राजकारण, स्वातंत्र्यानंतर भारतातील राजकारण

समाजशास्त्र

वर्ग पुस्तक
बारावी भारतात सामाजिक बदल आणि विकास, संस्कृती/ललित कला पुस्तके
अकरावी   भारतीय कलेची ओळख


विज्ञान पुस्तकातील महत्त्वाचे अध्याय

वर्ग अध्याय
सहावा अध्याय ९ : प्राणी आणि त्यांचे वातावरण
सातवा अध्याय ७: हवामान, पाणी आणि प्राण्याचे अनकूलन, अध्याय ९: माती
आठवा   धडा १: पीक उत्पादन व व्यवस्थापन, अध्याय ५ : कोळसा व पेट्रोलियम, अध्याय ७ : वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण, धडा १२ : घर्षण, अध्याय १८ : वायू व जल प्रदूषण
नववा अध्याय १४ : नैसर्गिक संसाधने
दहावा अध्याय १४ : ऊर्जा स्रोत, धडा १५: आमचे पर्यावरण, धडा १६ : नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन
बारावा  (जीवशास्त्र) - युनिट दहावा : पारितंत्र (अध्याय १३ - जीव आणि लोकसंख्या, अध्याय १४ - पारितंत्र, अध्याय १५ - जैवविविधता आणि संवर्धन, १६ - पर्यावरणीय समस्य

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT