CSIR-IMMT
CSIR-IMMT esakal
एज्युकेशन जॉब्स

CSIR-IMMT कंपनीत सहाय्यक पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

बाळकृष्ण मधाळे

CSIR-IMMT Recruitment 2021 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च कौंन्सिलच्या (सीएसआयआर) इन्स्टिट्यूट ऑफ मिनरल्स अँड मटेरियल्स टेक्नॉलॉजीने (आयएमएमटी) सहाय्यक आणि स्टेनोच्या पदांवरील भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे. गुरुवार 20 मे रोजी संस्थेने जाहीर केलेल्या भरती जाहिरातीनुसार, (क्र. 02/2021) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक आणि कनिष्ठ अशा एकूण 14 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. सीएसआयआर-आयएमएमटीने जाहीर केलेल्या या सर्व जागा रिक्त आहेत. (Recruitment For 14 Posts In CSIR-IMMT Company)

नॅशनल इन्स्टिट्यूटने सहाय्यक आणि स्टेनोच्या पदांवरील भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द केली आहे.

अर्ज कसा करावा

इच्छुक उमेदवार आयएमएमटीच्या अधिकृत भरती पोर्टलवर recruitment.immt.res.in अर्ज करू शकतात. 20 मेपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्जाच्या वेळी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने 100 रुपये अर्ज फी भरावी लागेल. तद्नंतर ऑनलाइन सबमिट केलेल्या अर्जाची हार्ड कॉपी 30 जून 2021 पर्यंत उमेदवारांनी त्यांच्या स्वाक्षर्‍या, प्रमाणपत्रांच्या प्रती आणि ऑनलाईन अर्ज शुल्काची प्रत यासह प्रशासक नियंत्रक, सीएसआयआर - खनिज व साहित्य तंत्रज्ञान संस्था, पठानी सामंत प्लॅनेटेरियम जवळ, आचार्य विहार, भुवनेश्वर - 751013 (ओडिशा). या पत्त्यावर पाठवावी.

क्षमता जाणून घ्या

कनिष्ठ सहाय्यक सचिवालय आणि कनिष्ठ स्टेनोग्राफर या पदांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 + 2 परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली पाहिजे. तसेच संगणकावर इंग्रजीमध्ये प्रति मिनिट किमान 30 शब्दांची गती असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कनिष्ठ सहाय्यक सचिवालय पदांसाठी उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 28 वर्षे व कनिष्ठ स्टेनोग्राफर पदांसाठी 27 वर्षे आहे.

Recruitment For 14 Posts In CSIR-IMMT Company

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT