Indian Post esakal
एज्युकेशन जॉब्स

Indian Post मध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी; 'इतक्या' जागांसाठी होणार भरती

सकाळ डिजिटल टीम

बारावीनंतर सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झालीय.

Indian Post Recruitment 2021 : बारावीनंतर सरकारी नोकऱ्या शोधणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झालीय. बिहार सर्कल ऑफ इंडिया पोस्टमध्ये पोस्टल असिस्टंट आणि पोस्टमनसह अनेक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना (Notification) जारी करण्यात आलीय. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण 60 पदांची भरती केली जाणार आहे.

Indian Post च्या बिहार सर्कलमध्ये या रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालीय. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 31 डिसेंबर 2021 पर्यंत मुदत देण्यात आलीय. या पदांकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला indiapost.gov.in भेट द्यावी लागणार आहे.

रिक्त जागांचा तपशील : Indian Post मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021आहे. या भरती अंतर्गत एकूण 60 पदांची भरती केली जाणार आहे.

पोस्टल सहाय्यक- 31 पदे

एमटीएस - 13 पदे

सहाय्यक - 11 पदे

पोस्टमन - 5 पदे

असा करा अर्ज

  • अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला indiapost.gov.in भेट द्या.

  • त्यानंतर वेबसाइटवरील मुख्यपेजवर असणाऱ्या Recruitments लिंकवर क्लिक करा.

  • आता बिहार सर्कलमधील स्पोर्ट्स कोटा अंतर्गत पोस्टल असिस्टंट/सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन आणि एमटीएस कॅडरसाठी थेट भरतीच्या पर्यायावर क्लिक करा.

  • त्यानंतर आपला संपूर्ण अर्ज भरून नोंदणी करा.

  • नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता.

पात्रता : या रिक्त पदांनुसार, पोस्टल असिस्टंट पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी उत्तीर्ण असावा. यासोबतच, उमेदवाराची निवड झाल्यास त्याला जॉइनिंग लेटर मिळण्यापूर्वी 60 दिवसांचे मूलभूत संगणक प्रशिक्षण घ्यावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Leader Arrest : राज ठाकरेंच्या शिलेदाराला फसवणूक प्रकरणात अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Yuzvendra Chahal Retirement : युझवेंद्र चहलने अचानक घेतली निवृत्ती; पोस्टने खळबळ, म्हणाला, माझ्यात अजूनही क्रिकेट शिल्लक, पण...

Mumbai News: शौचालयातील विषारी वायूमुळे 2 तरुणांचा मृत्यू; गोरेगावातील 'त्या' कारखान्याला टाळे ठोकण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : कॅप्टन स्मित मच्छार यांचा 'अशोक चक्रा'साठी विचार करावा, मिलिंद देवरा यांची पंतप्रधान मोदींना विनंती

Captain Smit Machhar: ‘कॅप्टन स्मित, धन्यवाद!’; इस्रायलकडून मुंबईत होर्डिंग्जद्वारे भारतीय वैमानिकाला सलाम

SCROLL FOR NEXT