Indian Navy esakal
एज्युकेशन जॉब्स

भारतीय नौदलात नोकरीची मोठी संधी; 'या' पदांवर होणार भरती

सकाळ डिजिटल टीम

सरकारी नोकरीच्या (Government job) शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी आहे.

Indian Navy Recruitment 2021 : सरकारी नोकरीच्या (Government job) शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी! भारतीय नौदलात विविध पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशनही (Notification) जाहीर करण्यात आले आहे.

भारतीय नौदलात कुक, कारभारी आणि सफाई कामगार ही पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, पगार यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलाय.

पदाचा तपशील (Post Details) : भारतीय नौदलाच्या नोटिफिकेशननुसार कुक, कारभारी आणि सफाई कामगार ही पदे भरली जाणार आहेत. या अंतर्गत एकूण 300 जागांची भरती होणार आहे. अर्ज केलेल्या एकूण उमेदवारांमधून सुरुवातीला गुणवत्तेच्या आधारावर 1 हजार 500 उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर उमेदवारांची लेखी परीक्षा आणि शारीरिक योग्यता चाचणी होणार आहे.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तसेच उमेदवाराचा जन्म 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2005 दरम्यानचा असणं गरजेचं आहे. कुक (शेफ) पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास शाकाहारी आणि मांसाहारी अन्न बनवावे लागेल. तसेच रोजच्या रेशनचा हिशेबही ठेवावा लागणार आहे.

अर्जाची अंतिम तारीख (Last Date of Application) : या भरतीसाठी उमेदवारांना 2 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. याबाबत अधिकृत वेबसाइटवर याची माहिती देण्यात आलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DMart Stock Price: डीमार्टच्या प्रॉफिटमध्ये 15 टक्के वाढ; तरीही शेअर 3 टक्के घसरला, गुंतवणूक करावी का?

'फुलपाखरू' मालिका अर्ध्यातच का सोडलीस? चेतन वडनेरेने सांगितलं खरं कारण; म्हणाला, 'एक वेळ अशी आली जेव्हा...'

INDW vs PAKW: पाकिस्तानला पराभूत केल्यानंतरही हरमनप्रीत कौर नाराज! म्हणाली, आता मायदेशात गेल्यानंतर...

RSS History: अभ्यासक्रमात आता 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास'; 'या' विद्यापीठाने घेतला महत्त्वाचा निर्णय

Natural Collagen Boosters: सप्लीमेंट्स विसरा! 'या' 5 नैसर्गिक पदार्थांनी वाढवा कोलेजन, त्वचारोगतज्ज्ञांनी शेअर केला खास Video

SCROLL FOR NEXT