RBI Job Vacancy GOOGLE
एज्युकेशन जॉब्स

RBI Job Vacancy: रिझर्व्ह बँकेत काम करण्याची मोठी संधी; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया

RBI Recruitment 2023: आरबीआयने जारी केलेल्या ग्रेड बी ऑफिसर भरती जाहिरातीनुसार, जाहिरात केलेल्या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ९ मे पासून सुरू होईल.

नमिता धुरी

RBI Job Vacancy : RBI मधील सरकारी नोकऱ्यांसाठी इच्छुक आणि RBI ग्रेड B भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विविध विभागांमध्ये ग्रेड बी ऑफिसर पदांच्या भरतीसाठी एक छोटी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

बँकेने आज प्रसिद्ध केलेल्या छोट्या जाहिरातीनुसार सामान्य, आर्थिक आणि धोरण संशोधन आणि सांख्यिकी आणि माहिती विभागात एकूण २९१ ग्रेड बी अधिकाऱ्यांची भरती होणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने अद्याप RBI ग्रेड बी अधिसूचना २०२३ ची तपशीलवार जाहिरात प्रसिद्ध केलेली नाही.  हेही वाचा - संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

९ मेपासून ग्रेड-बी अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

आरबीआयने जारी केलेल्या ग्रेड बी ऑफिसर भरती जाहिरातीनुसार, जाहिरात केलेल्या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ९ मे पासून सुरू होईल. पदांनुसार विहित पात्रता असलेले उमेदवार ६ जून २०२३ पर्यंत अर्ज सादर करू शकतील.

अर्जाची प्रक्रिया अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर सुरू होणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना आरबीआयने विहित केलेले परीक्षा शुल्क भरावे लागेल.

RBI recruitment advertisement

इतर पदांसाठी देखील अर्ज मागवले आहेत

RBI ने ग्रेड B अधिकार्‍यांच्या भरतीसाठी जारी केलेल्या जाहिरातीमध्ये इतर भरतीबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. यानुसार, बँकेला कार्यक्रम समन्वयक (पर्यवेक्षकांचे महाविद्यालय) (जाहिरात क्र. 1/2023-24) आणि कम्युनिकेशन कन्सल्टंट/मीडिया विश्लेषक (जाहिरात क्र. 2/2023-24) या पदांची कंत्राटी पद्धतीने भरती करायची आहे.

या पदांसाठी अर्जाची प्रक्रिया ४ मे २०२३ पासून सुरू होईल आणि अधिकृत वेबसाइट, rbi.org.in वरील भरती विभागात सक्रिय केलेल्या लिंकवरून उमेदवार ऑनलाइन फॉर्म पृष्ठावर जाऊन त्यांचे अर्ज सबमिट करू शकतील. .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Secret Meeting : शरद पवार गटाची गुप्त बैठक; पुण्यातील एका नामांकित हॉटेलमध्ये चर्चा, अजित पवार गटाचे काही आमदार संपर्कात?

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' मार्गांवर विशेष मेगाब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांना फटका; पाहा लोकलचं वेळापत्रक

Latest Marathi News Live Update : भिवंडीत भाजी मार्केट परिसरात अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई

लखनौकडून चेन्नईचा धुव्वा! ऋतुराज गायकवाडने पराभवानंतर मान्य केली मोठी चूक, म्हणाला आम्ही...

Manoj Jarange : जरांगेंचा पुन्हा एल्गार! ३० मे पासून बेमुदत उपोषणाची घोषणा, आता काय आहे मागणी?

SCROLL FOR NEXT