Indian Oil  google
एज्युकेशन जॉब्स

Indian Oil : 'इंडियन ऑइल'मध्ये दहावी-बारावी उत्तीर्ण आणि पदवीधरांची भरती

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे ही भरती 1760 पदांसाठी आयोजित केली जात आहे.

नमिता धुरी

मुंबई : भारत ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड ने 1760 पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १४ डिसेंबरपासून सुरू झाली आहे.

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे ही  भरती 1760 पदांसाठी आयोजित केली जात आहे. या भरतीसाठी योग्य आणि इच्छुक उमेदवार ऑनलाइन  iocl.com वर अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 14 डिसेंबर ते 3 जानेवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

पात्रता -

भरती परीक्षेसाठी 10वी, 12वी आणि पदवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती परीक्षेत वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत.

तंत्रज्ञ पदासाठी अर्ज करणारा उमेदवार 50% गुणांसह अभियांत्रिकी उत्तीर्ण असावा. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे किमान 50टक्के गुणांसह बीए, बीएससी, बीकॉम इत्यादींपैकी एखादी पदवी असावी.

वयोमर्यादा -

२१ ते २४ वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

पदांचा तपशील -

1760 पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. ट्रेड अप्रेंटिस, ग्रॅज्युएट अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती होणार आहे. भरती परीक्षेतून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, झारखंड, चंदीगड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात इत्यादी ठिकाणी होईल.

निवड प्रक्रिया -

उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाईल. या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. त्यासाठी उमेदवारांना चार पर्याय देण्यात येतील .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT