मुंबई उच्च न्यायालय Sakal
एज्युकेशन जॉब्स

मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली 247 लिपिक पदांची भरती!

मुंबई उच्च न्यायालयात सुरू झाली 247 लिपिक पदांची भरती!

सकाळ वृत्तसेवा

लिपिक पदाची नोकरी शोधणाऱ्या इच्छुकांसाठी सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे.

लिपिकाची नोकरी (Government Job) शोधणाऱ्या इच्छुकांसाठी सरकारी नोकरीची बातमी. मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) 247 लिपिक पदांच्या भरतीसाठी (Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 13 डिसेंबर 2021 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार 23 डिसेंबर 2021 पासून ऑनलाइन अर्ज करू शकतात. लिपिक भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख उच्च न्यायालयाने 6 जानेवारी 2022 निश्‍चित केली आहे. (Recruitment of 247 clerical posts started in Mumbai High Court)

असा करा अर्ज

मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती 2022 साठी अर्ज करण्याकरिता उमेदवारांना अधिकृत वेबसाइट bombayhighcourt.nic.in ला भेट द्यावी लागेल आणि नंतर भरती विभागात जावे लागेल. लिपिक पदांसाठी अधिसूचना आणि ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्मची लिंक भरती पेजवर दिली आहे. तथापि, उमेदवार अधिसूचना डाउनलोड करून ऍप्लिकेशन पेजवर भेट देऊ शकतात. अर्जादरम्यान उमेदवारांनी नोंदणी शुल्क 25 रुपये ऑनलाइन पद्धतीने जमा करावे. तथापि, अधिकृत वेबसाइटवर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना 250 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.

जाणून घ्या पात्रता व निकष

मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती 2022 अधिसूचनेनुसार इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, संगणक टायपिंगमधील मूलभूत अभ्यासक्रम किंवा इंग्रजी टायपिंगमधील ITI प्रमाणपत्र आणि उमेदवारांचा टायपिंगचा वेग किमान 40 wpm असावा. याशिवाय, अर्ज प्रकाशित केल्याच्या तारखेनुसार उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT