"कोल इंडिया'मध्ये बीटेक, एमटेकसाठी 500 पेक्षा जास्त पदांची भरती Canva
एज्युकेशन जॉब्स

'कोल इंडिया'मध्ये बीटेक, एमटेकसाठी 500 पेक्षा जास्त पदांची भरती

"कोल इंडिया'मध्ये बीटेक, एमटेकसाठी 500 पेक्षा जास्त पदांची भरती

श्रीनिवास दुध्याल

कोल इंडिया लिमिटेडने व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

सोलापूर : कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited) (CIL) ने व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (Management trainee) पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार खाण (Mine), इलेक्‍ट्रिकल (Electrical), मेकॅनिकल (Mechanical), सिव्हिल (Civil), इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग (Industrial Engineering) आणि जिओलॉजी (Geology) विभागासाठी प्रशिक्षण पदांवर नेमणुका केल्या जातील. या अंतर्गत एकूण 588 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यारे उमेदवार गेट परीक्षेत पात्र असणे आवश्‍यक आहे. GATE परीक्षेतील गुणांच्या आधारे अर्जदारांची निवड केली जाईल.

या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच 10 ऑगस्ट, 2021 पासून सुरू झाली आहे आणि शुल्कासह ऑनलाइन सबमिशनची अंतिम तारीख 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12 पर्यंत आहे. सीआयएलने जारी केलेल्या अधिसूचनेत, उमेदवारांना आगाऊ अर्ज भरण्यास आणि शेवटच्या दिवसापर्यंत प्रतीक्षा न करण्यास सांगण्यात आले आहे; कारण शेवटच्या क्षणी अर्ज केल्यामुळे अनेक वेळा उमेदवारांना अडचणी येऊ शकतात.

कोल इंडिया लिमिटेडमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थीसाठी असा करा अर्ज

मॅनेजमेंट ट्रेनीच्या पदांवर भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांनी coalindia.in या अधिकृत वेबसाइटवर जावे. त्यानंतर मेन पेजवरील करिअर विथ सीआयएल लिंकवर क्‍लिक करा. त्यानंतर जॉब इन कोल इंडियावर क्‍लिक करा. त्यानंतर सर्व तपशील भरा आणि सर्व कागदपत्रे अपलोड करा. त्यानंतर फी भरा आणि त्याची प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी ठेवा.

शैक्षणिक पात्रता

खाण, इलेक्‍ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल आणि औद्योगिक अभियांत्रिकी विभागांसाठी व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदासाठी किमान पात्रता असलेल्या उमेदवारांकडे BE / B.Tech / B.sc पदवी असणे आवश्‍यक आहे. अर्जदारांनी हे लक्षात घ्यावे की (अभियांत्रिकी) किमान 60 टक्के गुण असणे आवश्‍यक आहे. हीच अट जिओलॉजी विषयातील उमेदवारांसाठीही आहे.

M.Sc ची किमान पात्रता असणे आवश्‍यक आहे. याशिवाय किमान 60 टक्के गुण एम. टेक जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजीमध्ये असावेत. त्याचवेळी, प्रत्येक उमेदवाराने लक्षात घ्यावे, की फक्त एकाच पदासाठी अर्ज भरला जाईल. अर्जदारांनी हे लक्षात घ्यावे की अभियांत्रिकीमध्ये GATE 2021 गुण अनिवार्य आहे, ज्याच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

हे असेल शुल्क

सामान्य, ओबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाच्या स्वरूपात जीएसटीसह 1180 रुपये भरावे लागतील. याशिवाय एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांना शिथिलता दिली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT