Jobs_2020 Gallery
एज्युकेशन जॉब्स

अणुऊर्जा विभागाच्या 'या' कंपनीमध्ये विविध पदांची भरती!

अणुऊर्जा विभागाच्या "या' कंपनीमध्ये विविध पदांची भरती! 5 ऑक्‍टोबरपर्यंत करा अर्ज

श्रीनिवास दुध्याल

अणुऊर्जा विभागात सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांनो, तुमच्यासाठी आता नोकरीची मोठी संधी चालून आली आहे.

सोलापूर : अणुऊर्जा विभागात सरकारी नोकरी (Jobs) शोधणाऱ्या उमेदवारांनो, तुमच्यासाठी आता नोकरीची मोठी संधी चालून आली आहे. आयआरईएल इंडिया लिमिटेड (IREL India Limited) या भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाअंतर्गत (Department of Atomic Energy) सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने देशभरातील त्यांच्या प्रकल्प / युनिट / कार्यालयाकरिता 54 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. कंपनीने जारी केलेल्या जाहिरातीनुसार पदवीधर प्रशिक्षणार्थी (वित्त), पदवीधर प्रशिक्षणार्थी (एचआर), डिप्लोमा प्रशिक्षणार्थी (तांत्रिक), कनिष्ठ पर्यवेक्षक (राजभाषा), पर्सनल सेक्रेटरी आणि ट्रेड्‌समन ट्रेनी या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.

असा करा अर्ज

इच्छुक उमेदवारांनी IREL (इंडिया) लिमिटेडच्या irel.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. नंतर करिअर सेक्‍शनमध्ये जावे. करिअर पेजवर जाहिरात क्र. (CO/HRM/07/2021) ही भरतीची जाहिरात डाउनलोड करण्यासाठी आणि ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्‍लिक केल्यास उमेदवार अर्ज पेजवर जाऊ शकतात, जिथे त्यांना नवीन नोंदणीवर क्‍लिक करून प्रथम नोंदणी करावी लागेल आणि नंतर त्यांचा ई-मेल आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगइन करून अर्ज सबमिट करावा लागेल. आयआरईएलमधील या पदांसाठी अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबरपासून सुरू झाली आहे आणि शेवटची तारीख 5 ऑक्‍टोबर 2021 आहे.

उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करताना 400 रुपये शुल्क भरावे लागेल, जे ऑनलाइन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बॅंकिंग) भरता येईल. तथापि एससी, एसटी, ईएसएम, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी फीमध्ये सूट दिली आहे. पात्रता निकष, निवड प्रक्रिया आणि विविध पदांसाठी व इतर माहितीसाठी उमेदवार भरती जाहिरातीच्या लिंकला भेट देऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sunetra Pawar: चाकणकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडी, खड्डे अन् अतिक्रमणांवर प्रशासनाची धडक कारवाई, उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT