music sakal
एज्युकेशन जॉब्स

संगीत क्षेत्रातील शिक्षणाने करिअरला लय

भरमसाट पर्याय उपलब्ध; देशामध्ये हजारो वर्षाची परंपरा

केतन पळसकर

ताल, लय व स्वर यांच्या त्रिवेणी संगमातूनच संगीत जन्माला येते. संगीत एक अशी प्रक्रिया आहे की तिच्या माध्यमातून मानवी भावनांना सृजनात्मक रूप दिले जाऊ शकते. संगीतच आपल्या मनाला तसेच मेंदूला आनंद प्रदान करीत असते. जगात असा एकही व्यक्ती नसेल की त्याला संगीत आवडत नसेल. भारतात हजारो वर्षांपासून संगीताची परंपरा आहे. त्यामुळे, भारतीयांचे संगीताशी आगळेवेगळे नाते जुळले आहे. या क्षेत्रातील अभ्यासक्रम आणि संधींबाबत माहिती घेऊया.

करियरचे विविध पर्याय

गायक किंवा वादक होण्याव्यतिरिक्त या क्षेत्रात कम्पोजर, प्रशिक्षक, गीतकार, म्युझिक पब्लिशर, म्युझिक जर्नालिस्ट, डिस्क जॉकी, म्युझिक थेरपिस्ट, आर्टिस्ट तसेच संगीत कंपन्यांचे जनसंपर्क अधिकारी असे करियरचे विविध पर्याय उपलब्ध असतात. म्युझिक चॅनल्सची दिवसेंदिवस वाढणारी लोकप्रियता व कार्यक्रमांना कार्पोरेट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात दिले जाणारे प्रायोजकत्व, यामुळे संगीत क्षेत्रात करियर करण्याकडे उमेदवारांचा कल वाढत आहे.

शैक्षणिक पात्रता

संगीत क्षेत्रात करियर करत असताना कुठली विशेष शैक्षणिक योग्यतेची आवश्यकता नसते. तरी देखील कुठल्याही संगीत महाविद्यालयात प्रवेश घेण्याआधी दहावी, बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संगीत क्षेत्रात प्रमाणपत्र, पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा कालावधी एक वर्ष, पदवीचा तीन वर्षे तर पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा आहे.

संगीत विषयाचा अभ्यासक्रम

संगीत विषयाचे शिक्षण व प्रशिक्षण विविध संस्थांमधून दिले जाते.

भारतात मद्रास येथील कलाक्षेत्र व दिल्ली येथील भारतीय कला केंद्र, या संस्था संगीत क्षेत्रातील नामांकित संस्था आहेत.

प्रशिक्षण हीच पहिली पायरी

प्रतिभा, अभिरुची व परिश्रम घेणाऱ्या उमेदवारांना संगीत क्षेत्रात यशाची उंच भरारी सहज घेता येते. भारतीय संगीताची परंपरा जगातली सर्वांत जुनी व महान आहे. संगीत राग व ताल यांच्यावर आधारित आहे. त्यात लय व माधुर्याचा रंग भरण्याचे काम गायक करत असतात. काही व्यक्तींना मिळालेला सुमधुर आवाज तर परमेश्वराकडून मिळालेली देणगीच असते. मात्र, या दिशेने करियरची वाटचाल सुरू करण्यासाठी भरपूर अभ्यास व सरावाची आवश्यकता असते. कुठल्याही संगीत महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे ही करियरची पहिली पायरी आहे.

महाराष्ट्रातील संगीत संस्था

  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर (कँम्पस)

  • गांधर्व संगीत महाविद्यालय, मिरज (जि. सांगली)

  • संगीत विभाग, ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ परिसर, पुणे

  • संगीत विभाग, एस. एन. डी. टी. महाविद्यालय, मुंबई.

मध्यप्रदेशातील संगीत संस्था

  • सिलाम्बम, पद्मा एस. राघवन बी २, ४९, एमआईजी कॉलनी, संजय उपवन, इंदौर

  • नृत्यायन लता सिंग, एमआईजी, ६९, कोटरा सुल्तानाबाद, भोपाल

  • आदर्श कला मंदिर, ग्वाल्हेर

  • आनंद म्युझिक कॉलेज, राजबाड़ा, धार

  • भारतीय संगीत महाविद्यालय, ग्वाल्हेर

  • शासकीय संगीत महाविद्यालय, मैहर

  • शासकीय माधव संगीत महाविद्यालय, उज्जैन

  • बी.ए. (ऑनर्स म्युझिक)

  • बी.ए. (व्हिज्युअल आर्ट, म्युझिक, डांस व ड्रामा)

  • बी.ए. (म्युझिक)

  • बी.ए. (तबला)

  • बी.एफ.ए (तबला)

  • सर्टिफिकेट कोर्स

  • अन म्युझिक

  • म्युझिक डिग्री

  • म्युझिक डिप्लोमा

  • सितार डिप्लोमा

  • तबला डिप्लोमा

  • एम.एस इन म्युझिक

  • एम.फिल इन म्युझिक

  • पीएचडी इन म्युझिक

  • अंडरग्रॅज्युएट डिप्लोमा

  • इन म्युझिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Guru Purnima Remedies 2025: गुरु पौर्णिमेच्या रात्री करा 'हे' उपाय, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

SCROLL FOR NEXT