12th exam Result  esakal
एज्युकेशन जॉब्स

12th Exam Result : आई-वडिलांचं छत्र नसताना स्वत: काम करून पठ्ठ्यानं 12 वी परीक्षेत मिळवले '35 टक्के'

प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द व मेहनतीच्या जोरावर काहीजण यश खेचून आणतात. नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे.

अमित गवळे : सकाळ वृत्तसेवा

अवघ्या 10 वर्षांचा असताना रोशनचे वडील धरणात बुडून दगावले. त्यानंतर त्याची आई घर सोडून गेली. रोशन सोबत त्याची लहान बहीण व दोन वर्षांनी मोठा भाऊ होता.

पाली : प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द व मेहनतीच्या जोरावर काहीजण यश खेचून आणतात. नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये सुधागड तालुक्यातील (Sudhagad) आसरे येथील रोशन ज्ञानदेव लांगी याने तब्बल 35.67 टक्के मिळवून 12 वी (शाखा विज्ञान) परीक्षा (12th Exam Result) पास केली. आई-वडिलांचे छत्र नसतांना काम करून जिद्द व मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश संपादित केले आहे. त्यामुळे त्याच्या या अनोख्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अवघ्या 10 वर्षांचा असताना रोशनचे वडील धरणात बुडून दगावले. त्यानंतर त्याची आई घर सोडून गेली. रोशन सोबत त्याची लहान बहीण व दोन वर्षांनी मोठा भाऊ होता. रोशन आपल्या काकाकडे राहू लागला आणि सोबतच काकाचा डीजेचा व्यवसाय (DJ Business) सांभाळू लागला हा व्यवसाय सांभाळतच तो आपला उदरनिर्वाह देखील करत आहे.

मोठा भाऊ चौदाविला आहे, तर बहीण दहावीत आहे. अगदी लहान वयातच रोशननी आपली भावंड व स्वतःची जबाबदारी खांद्यावर घेतली आणि आज बरोबर स्वतःच्या पायावर उभे राहत 17 नंबरचा फॉर्म भरून बारावी सायन्सची परीक्षा दिली. घरची जबाबदारी सांभाळत कामधंदा करत मिळेल त्या वेळेमध्ये अभ्यास करून रोशनने बारावीची परीक्षा पास केली. त्याला पुढे आणखी शिकायचे आहे. त्याच्या या जिद्दीला व मेहनतीला सर्वांनी सलाम केला आहे.

अत्यंत लहान वयात कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेत रोशनने चिकाटी, जिद्द व मेहनत या जोरावर बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याला पस्तीस टक्के गुण मिळाले असले तरी त्याच्या पाठीमागे त्याची मेहनत व प्रतिकूल परिस्थितीवर केलेली मात दिसून येते.

-सूरज मेंडन, मावस भाऊ व मार्गदर्शक, पाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Cancel: इस्रायल-इराण युद्धाचा फटका! पुणे-मुंबईहून परदेशी जाणारी विमाने रद्द; देशभरात विमानतळांवर प्रवासी अडकले

Pune Transport Strike: टोल, कर, ई-चलन धोरणाविरोधात पाच मार्चपासून बेमुदत आंदोलन

Agra STF Encounter: एसटीएफचा 'धडाका'! शार्पशूटर गुंडाचा आग्र्यात एन्काउंटर; १० वर्षांपूर्वी लुटलेली सरकारी पिस्तूल अखेर जप्त

Devotional Journey: शेगाव वारीचा अलौकिक अनुभव! डोळे भरून दर्शन घेताच जीवन कृतार्थ झालं

Niphad Online Ration Card : जुनी रेशनकार्ड इतिहासजमा; आता घराघरात ई-शिधापत्रिका, गैरव्यवहाराला बसणार पूर्ण आळा

SCROLL FOR NEXT