Railway Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

रेल्वेत 'या' पदासाठी बंपर भरती; पगारही मिळणार चांगला

सकाळ डिजिटल टीम

रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या माध्यमातून विविध झोनमध्ये अप्रेंटिस पदांवर भरती केली जात आहे.

RRC Railway Recruitment 2021 : रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या माध्यमातून विविध झोनमध्ये अप्रेंटिस पदांवर भरती केली जात आहे. या पदभरतीअंतर्गत पूर्व, पश्चिम, उत्तर मध्य आणि इतर ठिकाणी अप्रेंटिस पदांची भरती केली जाणार आहे. याची अर्ज प्रक्रिया सुरु असून अंतिम मुदतीचा तपशील देण्यात आलाय. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचाय. रेल्वेनं विविध झोनसाठी वेगवेगळे नोटिफिकेशन जाहीर केले आहेत.

उत्तर मध्य रेल्वेनं (NCR) अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. यासाठी उमेदवार, RRC प्रयागराजच्या अधिकृत वेबसाइटवर rrcpryj.org जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 2 नोव्हेंबरपासून सुरू झालीय, तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 डिसेंबर 2021 आहे. या भरती मोहिमेद्वारे रेल्वेत 1664 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

दरम्यान, या पदांसाठी उमेदवाराने एसएससी अथवा 10 वी परीक्षेत किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच संबंधित क्षेत्रातील आयटीआय पदवी देखील गरजेची आहे. अर्जासाठी वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे निश्चित करण्यात आलीय. तसेच उमेदवाराला अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. तर, आरक्षित वर्ग/पीडब्ल्यूडी/महिला अर्जदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. 10 वीच्या गुणांच्या आधारे मेरिटद्वारे ही भरती केली जाईल. यात निवडलेल्या उमेदवारांना 56,900 रुपये पगार दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; जगभरात फक्त 200 प्रकरणांमध्ये नोंद, काय म्हणाले डॉक्टर?

Latest Marathi News Live Update : चंद्रकांत पाटलांना जाब विचारणार, घायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकर आक्रमक

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

SCROLL FOR NEXT