RTE 25 percent admission announced on Wednesday education pune sakal
एज्युकेशन जॉब्स

RTE Admission : आरटीई २५ टक्के प्रवेशाची ऑनलाइन सोडत बुधवारी होणार जाहीर

बालकांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांची प्रतीक्षा संपणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तुम्ही आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन सोडत कधी निघणार या प्रतीक्षेत असाल, तर मग इकडे नक्की लक्ष द्या. शिक्षण हक्क कायद्यातंर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाइन सोडत येत्या बुधवारी (ता. ५) सकाळी अकरा वाजता काढण्यात येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत बालकांच्या प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या पालकांची प्रतीक्षा संपणार आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार (आरटीई), दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. त्यानुसार २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी  आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत बुधवारी काढण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.

राज्यातील सुमारे एक लाख एक हजार ९६९ जागांवर प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या तब्बल तीन लाख ६४ हजार ४७२ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रतीक्षा बुधवारी अखेर संपणार आहे. यावेळी ऑनलाइन सोडतीत प्रवेश मिळालेल्या बालकांच्या प्रवेश अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविण्यात येईल.

तसेच आरटीई पोर्टलवरही बालकांच्या प्रवेश अर्जासाठी केलेल्या लॉगिनमध्ये संबंधित बालकाला प्रवेशासाठी मिळालेल्या शाळेचा तपशील दिसणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी पालकांनी ‘https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex’ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.

  • राज्यातील आरटीई शाळा : ८,८२८

  • प्रवेशासाठी उपलब्ध जागा : १,०१,९६९

  • आलेले अर्ज : ३,६४,४७२

जिल्हा : आरटीई शाळा : प्रवेशासाठी उपलब्ध जागा : प्रवेशासाठी आलेले अर्ज

नगर : ३६४ : २,८२५ : ९,७३१

औरंगाबाद : ५४७ : ४,०७३ : २०,७७९

जळगाव : २८२ : ३,१२२ : ११,२९०

नागपूर : ६५३ : ६,५७७ : ३६,४९०

नांदेड : २३२ : २,२५१ : ११,११०

नाशिक : ४०१ : ४,८५४ : २१,९४८

पुणे : ९३६ : १५,६५५ : ७७,५३१

ठाणे : ६२९ : १२,२७८ : ३१,६७९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 270 अंकांनी वाढला; शेवटच्या तासात बाजाराने घेतला यू-टर्न, काय आहे कारण?

'चला हवा येऊ द्या २' मध्ये भाऊ कदम का नाही? प्रेक्षक नाराज; अखेर खरं कारण समोर

Pakistani Boat Raigad : रायगडच्या समुद्रात पाकिस्तानी संशयित बोट, गुप्तचर विभागाला मॅसेज; जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली बैठक

Shocking News: नवरदेव आणि वऱ्हाडींना मंडपातच बेदम चोपले, हॉस्पिटलमध्येच लावाले लागले लग्न, तिथूनच नवरीची पाठवणी; नेमकं काय घडलं?

IND vs ENG 3rd Test: लॉर्ड्स जिंकायची तयारी...! टीम इंडियाची जबरदस्त रणनीती; जसप्रीत बुमराह आला आहेच, शिवाय...

SCROLL FOR NEXT