Rupali Karne
Rupali Karne esakal
एज्युकेशन जॉब्स

शिपायाची मुलगी बनली आयएसएस अधिकारी

ऋषिकेश पवार

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा, तर आशिया खंडातील सर्वात अवघड परीक्षा समजले जाते.

विसापूर : स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे हे महाकठीण काम. केंद्रीय लोकसेवा आयोगाची (Central Public Service Commission) परीक्षा, तर आशिया खंडातील सर्वात अवघड परीक्षा समजले जाते. अगदी खेड्यापासून, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, लाखो विद्यार्थी दिवस-रात्र अभ्यास करत असतात. जिल्हाधिकारी असो सुपर क्लास वन अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून हा प्रवास अखंड सुरू असतो. रूपाली दशरथ कर्णे (Rupali Karne) यातीलच एक नाव. वयाच्या २५ व्या वर्षी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रूपालीने भारतीय सांख्यिकी सेवा (Indian Statistical Service Examination) या विभागात आयएसएस अधिकारी (ISS Officer) झाली आहे. शेतकरी कुटुंबातल्या एका शाळेवर शिपाई म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या या मुलीने आपल्या स्वप्नांसाठी केलेल्या प्रवासाची गोष्ट थक्क करणारी आहे.

खटाव तालुक्यातील (Khatav Taluka) डिस्कळ बाजारपेठेचे गाव. या गावात शेतकरी कुटुंबात रूपालीचा जन्म झाला. रूपालीचे वडील दशरथ कर्णे हे यशवंतराव पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सोळांकूर (ता. राधानगरी) येथे शिपाई म्हणून कार्यरत आहेत. आई गृहिणी असून, घरची सर्व शेती सांभाळते. भाऊ योगेश हे शहाजीराजे महाविद्यालय खटाव (Shahajiraje College Khatav) येथे तासिका बेसवर प्राध्यापक म्हणून काम करतात व स्वतःचे कोचिंग क्लासेस आहेत. वडील दशरथ व बंधू योगेश हे शिक्षण क्षेत्रात काम करत असल्यामुळे रूपालीने भरपूर शिकावे व क्लास वन अधिकारी बनाव हे दोघांचे स्वप्न होते.

रूपालीचे प्राथमिक शिक्षण हे डिस्कळ येथे झाले. माध्यमिक शिक्षण श्री. यशवंतराव पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज सोळांकूर, उच्च माध्यमिक शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मुरगुड, बीएस्सी यशवंतराव चव्हाण ऑफ सायन्स कॉलेज सातारा व एमएस्सी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झाली. ग्रामीण भागातील मुलींना अनेक बंधन असतात. घरकामात मदत करणे, स्वयंपाक बनवणं यासारख्या विविध कामांत त्यांना अक्षरशः जुंपल जातं. मात्र, रूपालीला त्यांच्या कुटुंबीयांनी अभ्यासासाठी मोकळीक दिली होती. रूपाली बारावीत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर मेडिकल अथवा इंजिनिअरिंगला प्रवेश घेणार असे सगळ्यांनाच वाटू लागले. मात्र, रूपालीने बीएस्सी व त्यानंतर एमएस्सी करण्याचा निर्णय घेतला. रूपालीच्या या निर्णयावर सर्वांनीच प्रश्न उपस्थित केला. मात्र, रूपाली या निर्णयावर ठाम होती. तुला जे मनापासून वाटतंय ते तू कर असे वडिलांनी व बंधू योगेश यांनी सांगून तिला बराचसा आधार दिला.

प्रत्येक दिवस, आठवडा व महिन्याचे सूक्ष्म नियोजन

रूपालीला सुरुवातीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये अपयशाला सामोरे जावे लागले. त्यानंतर रूपालीने जून २०२० मध्ये प्रत्येक दिवस, आठवडा व महिन्याच्या अभ्यासक्रमाचे सूक्ष्म पद्धतीने नियोजन केले. याकामी योगेश व बहीण दीपा यांची खूप मदत झाली. जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर रूपालीने दुसऱ्यांदा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. वयाच्या २५ व्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून तिने आपले आयएसएस होण्याचे स्वप्न साकार केले. शेतकरी कुटुंबातील पोर ते सुपर क्लास वन अधिकारी बनण्याचा तिचा प्रवास सर्वांना प्रेरणा देणारा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT