rupali kale writes bright future of child his career is decided by parents parents should Understand student skills sakal
एज्युकेशन जॉब्स

पाल्याला समजून घेताना

आजकाल मुलांचं उज्ज्वल भविष्य, त्याचं करिअर पालक जन्माच्या आधीपासूनच ठरवतात. त्याप्रमाणे अगदी लहान वयातच त्याची शाळा, खेळ, मित्र, कोचिंग क्लास ठरवतात.

प्रा. रूपाली काळे

आजकाल मुलांचं उज्ज्वल भविष्य, त्याचं करिअर पालक जन्माच्या आधीपासूनच ठरवतात. त्याप्रमाणे अगदी लहान वयातच त्याची शाळा, खेळ, मित्र, कोचिंग क्लास ठरवतात. अनेकदा जाणवत की, पालकांकडून आपलं राहून गेलेले करिअर ते मुलांकडून पूर्ण व्हावं अशी अपेक्षा असते.

‘The best way of predict the future is to create it’ आजकाल मुलांचं उज्ज्वल भविष्य, त्याचं करिअर पालक जन्माच्या आधीपासूनच ठरवतात. त्याप्रमाणे अगदी लहान वयातच त्याची शाळा, खेळ, मित्र, कोचिंग क्लास ठरवतात. अनेकदा जाणवत की, पालकांकडून आपलं राहून गेलेले करिअर ते मुलांकडून पूर्ण व्हावं अशी अपेक्षा असते. कधी-कधी पालक सोसायटी, नातेवाईक, मित्र परिवार यांचा दबाव म्हणून मुलांच्या करिअरची निवड त्यांच्या मनाविरुद्ध करतात. मग ते चुकीचं करतात का? तर असं नाही. जग इतकं स्पर्धात्मक आहे की, त्यात आपलं मुल भरकटू नये ही अपेक्षा असते. त्यात पाल्याच्या आवडी निवडीचा नक्कीच विचार केलेला असावा. फार पूर्वीपासून इंजिनिअरिंग, वैद्यकीय आणि शैक्षणिक या क्षेत्रात करिअर अगदी जोमात होते. शैक्षणिक सोडलं तर इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय क्षेत्राची लोकप्रियता कायम आहे.

काय होतो विचार?

कमी वयात भरपूर पगार, परदेशात नोकरी ही पालकांकडून करिअरची व्याख्या मुलांच्या मनात रुजवली जातेय. त्यामुळे या व्याख्येत न बसणाऱ्या मुलाचा, पालकांचा ताण वाढतो आणि निराशा पदरी येते. वेगळ्या क्षेत्रात करिअर करणाऱ्या मुलांचं प्रमाण नक्कीच वाढतयं. खरंतर मुलांचं संगोपन करताना त्यांच्यातील उत्तम गुण पालक ओळखून असतात. तरीही समुपदेशकांकडे जाऊन आपल्या मनातील करिअर त्यांनी सांगावं, मुलाच्या आवडीच करिअर छंद म्हणून निवडावा असा आग्रह दिसतो. काही ठिकाणी ‘मी हेच केलं म्हणून, तू करायचं’ असाही आग्रह दिसतो. शिक्षणक्षेत्रात नोकरी करत असल्यामुळे रोजच जेईई, नीट, सीईटीत चक्रव्युहातील अभिमन्यूसारखी मुलांची अवस्था होताना दिसते. परंतु पालकांची मात्र चक्रव्यूहातून त्याला बाहेर काढण्याची तयारी नसते.

आवडत्या विषयाचं संशोधन

दहावीनंतर कितीतरी मुल सायन्स, आर्ट्स आदी शाखा निवडतात. परंतु त्यात नक्की काय करायचे हे १०० पैकी फक्त २५ टक्के मुलांना माहिती असते. उर्वरित ७५ टक्के फक्त प्रवाहात वहात असतात. मात्र कोणत्या किनाऱ्यावर जायचं हे माहितीच नसतं. पोहता येत नसत परिणामी बुडण्याची शक्यताच जास्त असते. सातवी, आठवीपासूनच त्याच्या आवडत्या विषयात संधीचा शोध सुरू करावा.

आपल्या आवडत्या विषयात एम. ए., एमएस्सी करून देश, विदेशात नोकरीच्या उत्तम संधी मिळतात. सध्या स्पोर्ट मेडिसीन, फिजिओ, ॲक्च्युरिअल सायन्स, स्कीन केअर, पेट मॅनेजमेंट, इव्हेंट, फ्लॉवर मॅनेजमेंट, व्हॉइस ओव्हर, हॉस्पिटॅलिटी, फूड टेक्नॉलॉजी, फार्मिग, थेरपिस्ट, मेडिकल टुरिझम आदी अनेक क्षेत्रातील संधी वाढत आहेत. अगदीच सांगायचं तर तुम्हाला मेहंदी चांगली काढता येत असेल, नेल पेंट डिझाईनिंग, झाडे चांगली लावता येत असतील, तर त्यांची काळजी घेणं असेल तर यात उत्तम शिक्षण घेऊन तुम्ही उत्तम करिअर करून पैसे आणि समाधान मिळवू शकता. चांगली नोकरी तुम्हाला फक्त पैसा, सुख-सुविधा देऊ शकते परंतु समाधान, आनंद देऊ शकत नाही. त्यामुळेच अनेक इंजिनिअर, डॉक्टर असलेली लोक काही वर्षातच आपलं करिअर संगीत, नाटक, चित्रपट आणि आपल्या आवडीचं करिअर निवडताना दिसतात.

पालकांनो, मुलांची क्षमता ओळखून त्यात करिअर करण्याची संधी द्या. त्याच्या पाठीशी भक्कम उभे रहा. इतर मुलांच्या प्रेरित करणाऱ्या गोष्टी नुसत्या न वाचता तुमच्या पाल्याला त्याचा भाग होऊ द्यात. उडण्यासाठी त्याचे पंख बळकट करा आणि मग जमिनीवर उभं राहून आकाशात त्याच्या उत्तुंग भरारीचा आनंद घ्यायला मात्र विसरू नका!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT