India Post esakal
एज्युकेशन जॉब्स

India Post मध्ये सरकारी नोकरीसाठी उत्तम संधी

बाळकृष्ण मधाळे

India Post GDS Recruitment 2021 : जर तुम्ही 10 वी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल, तर लवकरात-लवकर इंडिया पोस्टमधील पदांसाठी अर्ज करा! भारतीय पोस्टच्या (India Post) उत्तराखंड पोस्टल सर्कलमध्ये (Uttarakhand circles) बंपर भरती काढण्यात आली असून 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी आहे. ग्रामीण डाक सेवकाच्या 581 पदांवर ही भरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आली असून अर्ज करण्याची प्रक्रिया 22 सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन चालणार आहे. 'ग्रामीण डाक सेवक' या भरती अंतर्गत शाखा पोस्टमास्तर, सहाय्यक शाखा पोस्टमास्तर, डाक सेवक ही पदे भरली जाणार आहेत. दरम्यान, इच्छुक उमेदवार appost.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरु शकतात.

जर तुम्ही 10 वी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल, तर लवकरात-लवकर इंडिया पोस्टमधील पदांसाठी अर्ज करा!

रिक्त जागा

अधिसूचनेनुसार, उत्तराखंडमध्ये ग्रामीण डाक सेवक पदावरील रिक्त जागेत एकूण 581 पदांची भरती केली जाईल. यात सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी 317 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. याशिवाय, ईडब्ल्यूएस वर्गासाठी 57 जागा, ओबीसी उमेदवारांसाठी 78, एससी 99, एसटी उमेदवारांसाठी 15 आणि एच श्रेणीसाठी 15 जागा राखीव आहेत.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने 10 वी उत्तीर्ण केली असावी. या शिवाय, पदवीधारकांची दहावीपर्यंतच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल. यात केवळ गणित आणि इंग्रजी विषयाचे ज्ञान असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. तर अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 40 वर्षांपेक्षा कमी असावे. यामध्ये आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांना वरच्या वयोमर्यादेत शिथिलता दिली जाईल.

अर्ज फी

या रिक्त जागांकरिता अर्ज करण्यासाठी सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क (Application Fees) म्हणून 100 रुपये जमा करावे लागतील. तर SC-ST आणि महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

या सोप्या पद्धतीने अर्ज भरा

  • अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम भारतीय पोस्टच्या अधिकृत वेबसाइटला (appost.in.) भेट द्या.

  • वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर डावीकडे दिलेल्या Live Notifications (Cycle III विभाग) वर जा.

  • आता Uttarakhand circles Registration, Fee & Submission of online application वर क्लिक करा.

  • आता आपला संपूर्ण तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

  • नोंदणी केल्यानंतर तुम्ही अर्ज भरू शकता. अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंटही काढा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT