- सविता भोळे
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी (Indian Institute of Space Science and Technology) ही संस्था अनुदानित अभिनत विद्यापीठ आहे. ‘स्पेस सायन्स’मधील अभ्यास व संशोधन यासाठी सुरू करण्यात आलेली ही आशियातील पहिले विद्यापाठ असून २००७ मध्ये तिचे उद्घाटन ‘इस्रो’चे चेअरमन माधवन नायर यांच्या हस्ते झाले. इंडियन स्पेस प्रोग्रॅममध्ये संशोधक आणि इंजिनिअर्स उपलब्ध व्हावेत, या मुख्य उद्देशाने भारत सरकारच्या स्पेस सायन्स डिपार्टमेंट अंतर्गत ‘इस्रो’ने या संस्थेची स्थापना केली. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे या विद्यापीठाचे कुलपती होते. ‘स्पेस सायन्स’ची संबंधित ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि पीएचडी कोर्सेस येथे उपलब्ध आहेत.
या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरावयाचा असतो. त्यानंतर ग्रॅज्युएट कोर्सेस आणि ड्युअल डिग्रीसाठी जे ई ई ऍडव्हान्स ही प्रवेश परीक्षा तर पोस्ट ग्रॅज्युएटसाठी गेट ही परीक्षा विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करायची असते. पीएचडीसाठी संस्थेची ऑनलाइन लेखी परीक्षा व इंटरव्यूला सामोरे जावे लागते.
१) बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (B.Tech)
कालावधी ः ४ वर्षे
पात्रता ः बारावी
प्रवेश परीक्षा ः JEE Advanced
हा कोर्स १) एरोस्पेस इंजिनिअरिंग
२) ॲव्हिओनिक्स इंजिनिअरिंग. अशा दोन विषयात उपलब्ध आहे.
२) मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी (M.Tech)
कालावधी ः २ वर्षे
पात्रता ः पदवी
प्रवेश परीक्षा ः GATE
हा कोर्स १) अर्थ सिस्टीम सायन्स अँड टेक्नॉलॉजी
२) एरो डायनॅमिक्स अँड फ्लाइट मेकॅनिक्स
३) मशिन लर्निंग अँड कॉम्प्युटिंग
४) जिओ इन्फर्मेटिक्स
५) स्ट्रक्चर्स अँड डिझाईन
६) कंट्रोल सिस्टिम्स
७) डिजिटल सिस्टीम अँड सिग्नल प्रोसेसिंग
८) मटेरिअल सायन्स अँड टेक्नॉलॉजी
९) पॉवर इलेक्ट्रॉनिक्स
१०) VLSI अँड मायक्रो सिस्टीम
११) थर्मल अँड प्रोपलशन
१२) ऑप्टिकल इंजिनिअरिंग
१३) आर एफ अँड मायक्रोवेव्ह इंजिनिअरिंग
१४) क्वांटम टेक्नॉलॉजी.
अशा १४ विषयात उपलब्ध आहे.
३) बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी+मास्टर ऑफ सायन्स (B. Tech+MS)
कालावधी ः ५ वर्षे
पात्रता ः बारावी
प्रवेश परीक्षा ः JEE Advanced
हा कोर्स ॲस्ट्रॉनॉमी अँड फिजिक्स
सॉलिड स्टेट फिजिक्स अशा २ विषयात उपलब्ध आहे.
४) बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी+मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी (B.Tech+M.Tech)
कालावधी ः ५ वर्षे
पात्रता ः बारावी
प्रवेश परीक्षा ः JEE Advanced
हा कोर्स १) अर्थ सिस्टीम सायन्स
२) ऑप्टिकल इंजिनिअरिंग
अशा दोन विषयांत उपलब्ध आहे.
५) पीएच.डी. (Ph. D.)
कालावधी ः ३ वर्षे
पात्रता ः पोस्ट ग्रॅज्युएट
प्रवेश परीक्षा ः ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्ट + इंटरव्ह्यू
हा कोर्स १) एरोस्पेस इंजिनिअरिंग
२) फिजिक्स
३) मॅथेमॅटिक्स
४) अर्थ स्पेस सायन्स
५) ह्युमॅनिटीज
६) केमिस्ट्री
७) ॲव्हियनिक्स
अशा सात विषयात उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
संकेतस्थळ ः www.iist.ac.in
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.