Scholarship Exam Scholarship Exam
एज्युकेशन जॉब्स

Scholarship Exam: आता शिष्यवृत्ती परीक्षा होणार १२ ऑगस्टला

कोरोनामुळे या परीक्षेचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. आतापर्यंत या परीक्षेची तारीख सहा वेळा बदलण्यात आली आहे

संदीप लांडगे

कोरोनामुळे या परीक्षेचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. आतापर्यंत या परीक्षेची तारीख सहा वेळा बदलण्यात आली आहे

औरंगाबाद: Scholarship Exam: पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल करण्यात आला आहे. शिक्षण विभागाने ९ ऑगस्टला परीक्षा घेण्याचे निश्‍चित केले होते, मात्र आता पुन्हा ही परीक्षा १२ ऑगस्टला घेण्यात येणार असल्याचे परीक्षा परीषदेकडून कळविण्यात आले आहे. दरवर्षी पूर्व उच्च प्राथमिक (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक (आठवी) शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी घेण्यात येते. परंतु, कोरोनामुळे या परीक्षेचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. आतापर्यंत या परीक्षेची तारीख सहा वेळा बदलण्यात आली आहे.

कोरोनामुळे सुरुवातीला ही परीक्षा फेब्रुवारीऐवजी २५ एप्रिलला घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर २३ मे, २१ जून अशातारखा बदलत गेल्या. ८ ऑगस्ट ही तारीख निश्‍चित करुन परीक्षा परीषदेकडून सर्व नियोजन करण्यात आले होते. मात्र, त्याच दिवशी सेंट्रल आर्म पोलीस फोर्स पदाची परीक्षा होती. तसेच या परीक्षेसाठी नेमकी शिष्यवृत्ती परीक्षेचीच केंद्रे अधिग्रहित करण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा तारीख बदलून ९ ऑगस्ट करण्यात आली.

९ ऑगस्टला परीक्षा होणार असल्याने परीक्षा परीषदेकडून पुर्ण तयारी करण्यात आली होती. मात्र, ९ ऑगस्टला ‘जागतिक आदिवासी दिन’ असल्याने काही आदिवासी संघटनांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे आता या परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल करण्यात आला आहे. आता शिष्यवृत्ती परीक्षेसाठी १२ ऑगस्ट ही तारीख निश्‍चित करण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेचे उपायुक्त शैलजा दराडे यांनी पत्र जारी केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून या परीक्षेसाठी एकूण २ हजार ५१६ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US War : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये कोण चालवतंय सरकार? अमेरिकेलाही मिळतंय चोख प्रत्युत्तर...

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

Solapur B-2 Land Regularization : कोटींच्या जमिनी आता दोन ते पाच हजारांत नियमित; 80 एकरांवरील पुनर्विकासाला हिरवा कंदील, सोलापूरच्या रिअल इस्टेटला मिळणार बूस्टर

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT