Scholarship Exam Sakal
एज्युकेशन जॉब्स

इयत्ता पाचवी - आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलल्या

शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मीनाक्षी गुरव

पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन अर्ज (Online Application) भरण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच यापूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार २० फेब्रुवारी रोजी होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची सुधारित तारीख लवकर जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. (Scholarship Exam Postponed)

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (म्हणजेच इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (म्हणजेच इयत्ता आठवी) २०२२ संदर्भात परीक्षेची अधिसूचना परीक्षा परिषदेच्या ‘www.mscepune.in’ आणि ‘https://www.mscepuppss.in/’ या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या परीक्षेचे नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज (आवेदनपत्र)भरण्यासाठी १ ते ३१ २०२१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु आता शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत मुदतवाढ देण्यात येत आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अद्याप ऑनलाइन अर्ज न भरलेल्या शाळांना ३१ जानेवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ३१ जानेवारीनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाइन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज किंवा शुल्क भरता येणार नाही, याची सर्वांनी गांभीर्याने नोंद घ्यावी, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेची सुधारित तारीख लवकरच प्रसिद्ध होणार

‘‘शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिल्याने २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेच्या नियोजनासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलणे क्रमप्राप्त आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेची सुधारित तारीख यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल.’’

- एच. आय. आतार, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT