MES
MES Canva
एज्युकेशन जॉब्स

ड्राफ्ट्‌समन व सुपरवायझर पदांसाठी 20 जूनला होणारी परीक्षा रद्द !

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : सैन्य अभियंता सेवा (Military Engineer Services : MES) ड्राफ्ट्‌समन आणि सुपरवायझर (Draftsman and Supervisor : B/S) पदांच्या भरतीसाठी घेण्यात येणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भात अधिकृत संकेतस्थळावर एक छोटी नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील सूचना होईपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची नोटीसमध्ये नमूद आहे. उमेदवार mes.gov.in वर भेट देऊन नोटीस तपासू शकतात. (June 20 exam for draftsman and supervisor posts canceled)

या भरतीसाठी लेखी परीक्षा 20 जून 2021 रोजी घेण्यात येणार होती. त्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 22 मार्च 2021 पासून सुरू केली गेली. ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख 17 मे 2021 होती. त्याचबरोबर ऑनलाइन फी जमा करण्याची शेवटची तारीखही 17 मे 2021 रोजी निश्‍चित करण्यात आली होती. या भरती अंतर्गत एकूण 572 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ज्यामध्ये पर्यवेक्षकाची 458 आणि ड्राफ्ट्‌समनची 114 पदे समाविष्ट करण्यात आली आहेत.

यापूर्वी एकूण 502 पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती. तथापि, नंतर पदांची संख्या वाढविण्यात आली. यापूर्वीही लेखी परीक्षा एकदाच तहकूब करण्यात आली आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार 16 मे 2021 रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार होती. तथापि, अर्जाची अंतिम तारीख वाढविल्यानंतर लेखी परीक्षा 20 जून 2021 रोजी ठेवण्यात आली होती. आता या तारखेला होणारी परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन अपडेटसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर भेट देणे आवश्‍यक आहे.

महत्त्वपूर्ण म्हणजे, मान्यताप्राप्त संस्थांकडून आर्किटेक्‍चरल असिस्टंटशिपमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा प्राप्त केलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. पर्यवेक्षक पदासाठी अर्थशास्त्र / वाणिज्य / सांख्यिकी / व्यवसाय अभ्यास / सार्वजनिक प्रशासन या विषयांत पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांनी अर्ज केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, आम्हालाही तसाच नेता हवा.. पाकिस्तानी अब्जाधीशाने उधळली स्तुतीसुमनं

IPL 2024 : पावसामुळे 18 मे होणारा RCB Vs CSK सामना रद्द झाला तर… प्लेऑफसाठी कोण ठरणार पात्र?

Car Care: कडक उन्हात कार आतील बाजूस थंड ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 गोष्टी

Shirur Lok Sabha : मतांचा टक्का घसरल्यामुळे भल्याभल्यांचे अंदाज चुकणार... शिरूरमध्ये घड्याळ चालणार की तुतारी वाजणार?

Cannes Film Festival 2024 : कान्स फिल्म फेस्टिव्हलला मेरील स्ट्रीप यांचा सन्मान ; आईला केला पुरस्कार समर्पित

SCROLL FOR NEXT