सोलापूर : एज्युकेशनल टेस्टिंग सर्व्हिस (ईटीएस) टीओईएफएल परीक्षा आयोजित करते. ज्या विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठामध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि ज्यांची मातृभाषा इंग्रजी नाही अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देणे आवश्यक आहे. या चाचणीद्वारे अर्जदाराच्या इंग्रजी कौशल्याची चाचणी केली जाते, ज्यामध्ये इंग्रजीची माहिती, लिहिणे, बोलणे, वाचणे आणि समजून घेणे हे सर्व पाहिले जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी त्याचा अभ्यासक्रम समजून घेणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम जाणून घेतल्याशिवाय आपण परीक्षा पास करू शकत नाही.
या चाचणीचे चार भाग आहेत आणि आपल्याला या चार भागांबद्दल संपूर्ण माहिती येथे देत आहोत.
वाचन विभाग
परीक्षेचा हा विभाग विद्यार्थ्याच्या वाचन क्षमतेची चाचणी करतो. यामध्ये विद्यार्थ्यांना परिच्छेद दिले जातात आणि त्यानंतर संबंधित उत्तरे विचारली जातात.
लिसनिंग (ऐकण्याचा) विभाग
या विभागात अर्जदारास क्लासरूम किंवा शैक्षणिक व्याख्यानाबद्दल बोलताना ऐकले जाते आणि त्या आधारे प्रश्न विचारले जातात. यामध्ये अर्जदारांना ऑडिओ रेकॉर्डिंग काळजीपूर्वक ऐकण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रत्येक रेकॉर्डिंगमध्ये असे प्रश्न विचारले जातात ज्यांची उत्तरे द्यावी लागतात. या विभागासाठी एकूण 60 ते 90 मिनिटे दिली आहेत. या विभागानंतर दहा मिनिटांचा ब्रेक दिला जातो. यानंतर इतर दोन विभाग पुन्हा सुरू होतात.
स्पीकिंग विभाग
या विभागासाठी एकूण 20 मिनिटांचा कालावधी देण्यात आला असून या विभागात एकूण सहा स्पीकिंग टास्क दिले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना एखाद्या विषयावर आपली मते मांडावी लागतील. वाचन आणि ऐकण्याच्या कार्यावर आधारित या विभागात उत्तरे दिली आहेत.
परीक्षेच्या वेळी लक्षात ठेवा, दिलेल्या सर्व वेळेत आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. या चाचणीपूर्वी आपण संगणकावर या चाचणीचा सराव देखील करू शकता. या विभागात आपल्याला एक सोपा प्रश्न विचारला जाईल ज्याचे उत्तर आपल्याला द्यावे लागेल. उदाहरणार्थ, "जर एखादा मित्र परदेशातून भारतात येत असेल तर आपण भारताच्या कोणत्या शहरात त्याला वेळ घालवण्याची शिफारस कराल? याचे उदाहरण देऊन स्पष्टीकरण द्या.'
लेखन विभाग
या विभागात विद्यार्थ्यांना किमान दोन विषयांवर निबंध लिहावे लागतील. यासाठी केवळ 50 मिनिटे दिली जातात. या विभागात 22 गुण मिळवणे चांगले मानले जाते, जे या विभागात 50 टक्के गुण आहे. पहिल्या निबंधात आपल्याला सुमारे 150 ते 200 शब्द लिहावे लागतील, ज्यामध्ये आपल्याला वाचण्यासाठी शैक्षणिक उतारा दिला जाईल आणि दोन मिनिटांची ऑडिओ क्लिप ऐकवली जाईल. त्या दोन्हींच्या आधारे आपल्याला निबंध लिहावा लागेल. आपल्याला ते 20 मिनिटांत लिहावे लागेल. दुसऱ्या निबंधात आपल्याला वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी काहीही दिले नाही. आपण ते स्वत: लिहावे लागेल.
या टिप्स वापरून पाहा, टीओईएफएल सहज क्रॅक होईल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.