CMAT 
एज्युकेशन जॉब्स

NTA CMAT 2021 परीक्षा जाहीर ! जाणून घ्या ऍडमिट कार्ड, परीक्षेची तारीख व नमुना डाउनलोड कसे करावे

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) एमबीए / पीजीडीएम प्रोग्राममध्ये प्रवेशासाठी कॉमन मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट (CMAT) साठी प्रवेश पत्र जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी CMAT 2021 परीक्षेसाठी नोंदणी केली होती, ते आता अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करावी लागेल. 

परीक्षा कधी होईल? 
कॉमन मॅनेजमेंट ऍडमिशन टेस्ट (CMAT 2021) 31 मार्च 2021 रोजी घेतली जाईल. पेपर दोन शिफ्टमध्ये असेल. पहिली शिफ्ट सकाळी 9 ते 12 या वेळेत आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते 6 या वेळेत घेण्यात येईल. परीक्षेस बसलेले उमेदवार खाली दिलेल्या पद्धतीने किंवा थेट लिंकद्वारे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. 

सीएमएटी प्रवेशपत्र 2021 कसे डाउनलोड कराल? 
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी NTA CMAT च्या cmat.nta.nic.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या. होम पेजवर CMAT ऍडमिट कार्ड 2021 या लिंकवर क्‍लिक करा. नवीन पेज उघडेल जिथे अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेच्या सहाय्याने लॉग इन करावे लागेल. आपले प्रवेशपत्र स्क्रीनवर उघडेल. ते तपासा आणि डाउनलोड करा. एक प्रिंटआउट घ्या आणि आपल्याकडे ठेवा. 

पेपर कसा असेल? 
CMAT 2021 ऑनलाइन परीक्षा असेल, ज्यामध्ये एकूण 125 प्रश्न असतील. पेपर 500 गुणांचा असेल. पेपरचे माध्यम इंग्रजी असेल आणि एकूण गुणांपैकी प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक चिन्हांकन म्हणून एक गुण वजा केले जाईल. 

CMAT 2021 परीक्षा देशभरातील 153 शहरांमध्ये होणार 
CMAT 2021 परीक्षा NTA र्त 31 मार्च 2021 रोजी देशातील 153 शहरांमध्ये घेण्यात येईल. CMAT परीक्षा देशभरातील एक हजाराहून अधिक बिझनेस स्कूल्समध्ये एमबीए / पीजीडीएम प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी आहे. मागील वर्षी (2020 मध्ये) एकूण 74 हजार 486 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. 

ठळक... 

  • सीएमएटी 2021 ऑनलाइन परीक्षा हॉल तिकीट जाहीर 
  • 31 मार्च रोजी सुमारे 153 शहरांमध्ये होणार परीक्षा 
  • पात्र उमेदवार एमबीए / पीजीडीएम प्रोग्राममध्ये नोंदणी करतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates: भाजपमध्ये घराणेशाही नाही- देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT