RBI
RBI Esakal
एज्युकेशन जॉब्स

आरबीआय ऑफिस अटेंडंट परीक्षेचा निकाल लवकरच होणार जाहीर ! असा जाणून घ्या निकाल

श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियातर्फे (आरबीआय) (Reserve Bank of India) ऑफिस अटेंडंटच्या पदांवर भरतीसाठी लवकरच परीक्षेचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्‍यता आहे. परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षेला हजेरी लावणारे उमेदवार rbi.org.in किंवा opportunities.rbi.org.in वर जाऊन त्यांचे निकाल तपासू शकतील. लेखी परीक्षेत यशस्वी घोषित केलेले उमेदवार त्यांच्या रोल नंबरनुसार निकाल तपासू शकतील. (RBI office attendant exam results to be announced soon)

या टप्प्यानुसार तपासा तुमचा निकाल

निकाल जाहीर झाल्यानंतर तो तपासण्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट opportunities.rbi.org.in वर जाणे आवश्‍यक आहे. यानंतर आपणास मुख्य पेजवर उपलब्ध असलेल्या करंट व्हॅकेन्सी सेक्‍शनमध्ये रिजल्टच्या लिंकवर क्‍लिक करावे लागेल. आता एक नवीन टॅब उघडेल. संबंधित परीक्षेच्या निकालाच्या लिंकवर क्‍लिक करा. आता पुन्हा एक नवीन पेज उघडेल. येथे शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या रोल नंबरची लिंक उपलब्ध असेल. या लिंकद्वारे उमेदवार त्यांचे निकाल तपासू शकतात. आवश्‍यक असल्यास, हे पेज डाउनलोड करा आणि हार्ड कॉपी काढा.

आरबीआयने 9 आणि 10 एप्रिल 2021 रोजी ऑफिस अटेंडंट भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा घेतली. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचे कॉल लेटर 31 मार्च 2021 रोजी देण्यात आले होते. या भरतीची अधिसूचना 24 फेब्रुवारी 2021 रोजी जारी करण्यात आली होती. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया या दिवसापासूनच सुरू झाली. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2021 होती.

विशेष म्हणजे, या भरती अंतर्गत ऑफिस अटेंडंटची एकूण 84 रिक्त पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन लेखी परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी (एलपीटी) समाविष्ट असते. लेखी परीक्षेत यशस्वी घोषित झालेल्या उमेदवारांना भाषा प्रावीण्य चाचणीत भाग घ्यावा लागेल. अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT