Spices Board
Spices Board esakal
एज्युकेशन जॉब्स

Spices बोर्डाची रायबरेली, मुंबईसह 'या' प्रयोगशाळांत भरती; 'असा' करा ईमेलद्वारे अर्ज

बाळकृष्ण मधाळे

Spices Board Recruitment 2021 : सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी ही महत्वाची बातमी! भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अधीन असलेल्या स्पाइसेस बोर्ड इंडियाने (Spices Board) रायबरेली (उत्तर प्रदेश), कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे गुणवत्ता मूल्यांकन प्रयोगशाळांमध्ये गुणवत्ता विश्लेषक (Technical Analysts) आणि प्रशिक्षणार्थी (Trainees) पदांच्या भरतीसाठी तीन जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. यात एकूण 12 रिक्त जागा आहेत. 24 आणि 25 मे रोजी मंडळाने जाहीर केलेल्या तीन वेगवेगळ्या जाहिरातींनुसार पात्र उमेदवारांकडून पोस्ट अथवा ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. ही सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असून कराराचा कालावधी जास्तीत-जास्त दोन वर्षांचा असेल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. (spices board recruitment 2021 for 12 technical analysts and trainees apply by email by june 18)

स्पाइसेस बोर्ड इंडियाने (Spices Board) रायबरेली (उत्तर प्रदेश), कोलकाता, मुंबई आणि चेन्नई येथे गुणवत्ता मूल्यांकन प्रयोगशाळांमध्ये गुणवत्ता विश्लेषक आणि प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी तीन जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत.

टेक्निकल अॅनालिस्ट पदांसाठी असा भरा अर्ज

स्पाइसेस बोर्ड टेक्निकल अॅनालिस्ट (Technical Analysts) पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर (indianspices.com) आपला अर्ज भरु शकतात. संकेतस्थळावरील फॉर्म पूर्णपणे भरल्यानंतर, आपल्या प्रमाणपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती संबंधित क्षेत्रासाठी जारी केलेल्या अधिकृत ईमेल आयडीवर 18 जून 2021 पर्यंत ईमेल पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच, प्रशिक्षणार्थी पदांसाठी उमेदवार ऑफिशियल वेबसाइट किंवा बोर्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज भरु शकतात. त्यानंतर उमेदवार प्रमाणपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती संबंधित ईमेलवर पाठवू शकतात.

spices board recruitment 2021 for 12 technical analysts and trainees apply by email by june 18

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: वडेट्टीवारांचे आरोप खरे, उज्वल निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; एस. एम. मुश्रीफ यांची मागणी

ICC Player of The Month : यादीत भारताचा एकही खेळाडू नाही, युएई अन् पाकिस्तानचे क्रिकेटर आघाडीवर

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

SCROLL FOR NEXT