SSC CHSL Exam Esakal
एज्युकेशन जॉब्स

SSC CHSL 2023 : सीएचएसएल परीक्षेबाबत मोठी अपडेट! आता तब्बल ४,५२२ पदांवर होणार भरती

या सर्व पदांवर केंद्र सरकारच्या मंत्रालय आणि इतर विभागांमध्ये थेट भरती होणार आहे.

Sudesh

तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. एकत्रित संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षेतून (CHSL) होणाऱ्या भरतीमधील पदांची संख्या वाढवण्यात आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने याबाबत माहिती दिली. यापूर्वी या परीक्षेतून १६०० पदांवर भरती घेण्यात येणार होती.

यामध्ये लोअर डिव्हिजन क्लार्क, ज्युनिअर सेक्रेटेरिअल असिस्टंट, ज्युनिअर पर्सनल असिस्टंट, डेटा एंट्री ऑफिसर अशा पदांचा समावेश आहे. या सर्व पदांवर केंद्र सरकारच्या मंत्रालय आणि इतर विभागांमध्ये थेट भरती होणार आहे. २३ मे रोजी कर्मचारी आयोगाने याबाबत नोटीस जारी केल्याचे वृत्त जागरणने प्रसिद्ध केले आहे.

'या' तारखेपर्यंत करा अप्लाय

एसएससी सीएचएसएल (SSC CHSL Application) परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ९ मेपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ८ जून २०२३ आहे. तसंच, फी भरण्याची अंतिम मुदत १० जून आहे.

कसं करता येईल अप्लाय

अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना कर्मचारी निवड आयोगाच्या वेबसाईटवर (ssc.nic.in) जावं लागणार आहे. याठिकाणी गेल्यानंतर लॉग-इन सेक्शनमध्ये जाऊन आधी तुम्हाला अकाउंट तयार करावं लागेल. त्यानंतर लॉग-इन करून आपला अर्ज दाखल करावा लागेल.

कोण करू शकतं अप्लाय

कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १०+२, म्हणजेच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी याठिकाणी अर्ज करू शकतात. जे उमेदवार १२वीची परीक्षा देणार आहेत तेदेखील अर्ज करू शकतात. यासोबतच अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ऑगस्ट २०२३ पर्यंत १८ वर्षांपेक्षा जास्त आणि २७ वर्षांपेक्षा कमी असायला हवं. वयाच्या अटीमधील शिथिलतेबाबत अधिक माहिती तुम्हाला अधिकृत संकेतस्थळावर मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT