education  Sakal
एज्युकेशन जॉब्स

‘ईव्ही’तून मिळेल ‘स्टार्टअप’ला बूस्टर!

नोकरी/बाजारपेठ

सकाळ डिजिटल टीम

सुप्रिया बडवे

आपल्या देशात ‘स्टार्टअप’च्या माध्यमातून नवोन्मेष आणि उद्यमशीलता यासाठी एक सक्षम आणि सर्वसमावेशक व्यवस्था तयार केली आहे.

‘स्टार्टअप इंडिया’ उपक्रमातून अनेक नवीन उद्योग उदयास येत असून, ते सध्याच्या उद्योग-व्यवसायाला पोषक आणि पुढे घेऊन जाणारे ठरत आहेत.

उत्पादन विकास, अन्न प्रक्रिया, अनुप्रयोग विकास, माहिती तंत्रज्ञान सल्लागार आणि व्यवसाय पाठबळ सेवा या क्षेत्रात आतापर्यंत जास्तीत जास्त नोंदणीकृत स्टार्टअप नोंदणीकृत झाले आहेत. यात ४५ टक्के स्टार्टअप्सचे नेतृत्व महिला उद्योजकांकडे आहे.

हा कल अधिकाधिक महिला उद्योजकांना त्यांच्या कल्पना स्टार्टअपमध्ये परिवर्तित करण्यास प्रेरित करणारा आहे. त्यामुळे शिक्षण पूर्ण केलेल्या मुलींनी स्टार्टअप क्षेत्रात आपल्याला काय करता येईल, याचा जरूर विचार करावा.

सध्या ‘ईव्ही’ या ग्रीन मोबिलिटी क्षेत्रात स्टार्टअपच्या खूप संधी आहेत. इलेक्ट्रिक बॅटरी सारखी तत्सम उत्पादने डिझाईन, इंटिग्रेशन यांची सध्या बाजारात मागणी आहे. पाश्चात्त्य जगात इलेक्ट्रिक व्हेइकलमध्ये होत असलेल्या वाढीत स्टार्टअपचा वाटा मोठा आहे. त्यांनी या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणले.

हाच ट्रेंड भारतात दिसत आहे. स्टार्टअप्स भारतीय इको सिस्टमला अनोखे उपाय ऑफर करत आहेत. ईव्ही टेक्नॉलॉजी या ग्रीन मोबिलिटीमुळे स्टार्टअप्सला संधी उपलब्ध झाल्या आहेत. बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम, पॉवर कंट्रोल, युनिट मोटार बॅटरी, सेल्स अँड पिक्स ऑन बोर्ड चार्जिंग इंटिग्रेशन यासारख्या उत्पादनांवर संशोधन करून गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर प्रॉडक्ट उपलब्ध करून दिले जात आहेत.

सेफ्टी सारखे खूप महत्त्वाचे विषय स्टार्टअप्स कडून गांभीर्यपूर्वक अभ्यासले जाऊन तशा प्रॉडक्ट्सची निर्मिती केली जाते आहे. त्यामुळे ईव्ही सेक्टरमध्ये स्टार्टअपसाठी मोठी संधी असेल. विद्यार्थी किंवा नवव्यावसायिकांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी संशोधन किंवा नवकल्पनांवर भर द्यावा.

ओला इलेक्ट्रिक, एथर, हिरो मोबिलिटी सारख्या स्टार्टअप साध्या वाहन जगतात प्रचलित आहेत. आमची पुढील पिढी सुमेध आणि स्वस्तिद यांनी ADAS (Advanced Driver Assistance Systems) वाहनांचे संभाव्य अपघात टाळण्यासाठी ‘Starkenn’ टेक्नॉलॉजी नावाने स्टार्टअप सुरू केले आहे.

या अंतर्गत अपघात टाळण्यासाठी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर विकसित केले आहे. एखादा स्टार्टअप सुरू करण्यासाठी त्या मागची संकल्पना महत्त्वाची असते. ती समाजासाठी उपयोगी असणारी, सकारात्मक बदल घडवून आणणारी हवी. समाजाची असलेली नेमकी गरज ओळखून त्यावर उपाय देणारे स्टार्टअप्स आज युनिकॉर्न बनल्या आहेत. शुगर कॉस्मेटिक, पेटियम, लेन्सकार्ट अशी उदाहरणे तरुण उद्योजकांना प्रेरणादायी आहेत. त्यामुळे स्टार्टअपचा विचार करावा.

अभ्यासक्रम परस्पर पूरक हवेत

सध्या उद्योग आणि शिक्षण यात बरेच अंतर आढळून येते. उद्योग आणि शिक्षण यांची सांगड घालण्याची गरज आहे. अमेरिका, युरोप यासारख्या देशांमध्ये आपल्या आवडीचा विषय दुसऱ्या महत्त्वपूर्ण विषयांबरोबर सांगड घालून अभ्यासता येतो.

तशीच अभ्यासपद्धती आपल्याकडे हवी. तसेच रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये आपल्या इथे खूप काम होणे गरजेचे आहे. त्यासाठी इनक्युबेटर सेंटर, आरअँडडी लॅब या सारख्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच कौशल्यपूर्ण शिक्षणप्रणाली ही काळाची गरज आहे.

नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात कौशल्य विकासावर विशेष भर दिला आहे. त्याचा फायदा विद्यार्थी आणि उद्योग या दोघांना होईल. उद्यमतेला पोषक शिक्षण ही पहिली पायरी असेल, त्यातूनच नवकल्पना आणि चांगले स्टार्टअप निर्माण होतील.

(लेखिका ‘बेलराइज इंडस्ट्रीज’च्या कार्यकारी संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT