50 लाख जिंकण्याची सुवर्णसंधी! तुमची एक कल्पना बनवेल तुम्हाला करोडपती
50 लाख जिंकण्याची सुवर्णसंधी! तुमची एक कल्पना बनवेल तुम्हाला करोडपती esakal
एज्युकेशन जॉब्स

50 लाख जिंकण्याची सुवर्णसंधी! तुमची एक कल्पना बनवेल तुम्हाला करोडपती

सकाळ वृत्तसेवा

आयआयटीने नवोदितांसह नवीन स्टार्टअप आणि शालेय विद्यार्थ्यांना आमंत्रित केले आहे.

देशाची समस्या सोडवण्यासाठी तुम्ही नाविन्यपूर्ण कल्पना (Ideas) आणि तंत्रज्ञानाच्या (Technology) मदतीने उपाय शोधू शकत असाल, तर आयआयटी (IIT) तुम्हाला 50 लाख रुपये देईल. देशातील विविध क्षेत्रांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी संस्थेने नवोदितांसह नवीन स्टार्टअप (Startup) आणि शालेय विद्यार्थ्यांना आमंत्रित केले आहे. सादरीकरणानंतर नाविन्यपूर्ण कल्पना किंवा स्टार्टअप्स निवडले जातील. त्यांना पूर्णपणे व्यावसायिक बनवण्यासाठी, आयआयटी मेंटॉर, लॅबसह 50 लाखांपर्यंतची आर्थिक मदत करेल. (Startups and student ideas will get Rs fifty lakh from IITs)

15 फेब्रुवारीपर्यंत करा संस्थेच्या वेबसाइटवर अर्ज

आयआयटीने देशातील समस्यांची आठ प्रमुख क्षेत्रांमध्ये विभागणी केली आहे. या क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना मागवण्यात आल्या आहेत. 'बिग के' (Big K) नावाने सुरू झालेल्या योजनेत संस्थेच्या वेबसाइटवर 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. आयआयटीच्या स्टार्टअप इनक्‍युबेशन आणि इनोव्हेशन सेंटरचे (IIT Startup Incubation and Innovation Center) प्रभारी प्रा. अमिताभ बंदोपाध्याय (Amitabh Bandopadhyay) यांच्या मते, अर्जदार मेडटेक डिव्हाइसेस आणि डायग्नोस्टिक्‍स, ऍग्रीटेक, इंडस्ट्रियल बायोटेक्‍नॉलॉजी, बायो फार्मा, एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस, मशीन लर्निंग/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स/ बिग डेटा ऍनालिटिक्‍स, व्हेटरनरी सायन्सेस आणि क्‍लीन एनर्जी सेक्‍टर्समध्ये (Medtech Devices & Diagnostics, Agritech, Industrial Biotechnology, Bio Pharma, Environmental Sciences, Machine Learning / Artificial Intelligence / Big Data Analytics, Veterinary Sciences and Clean Energy Sectors) नाविन्यपूर्ण कल्पना मांडू शकतात.

आयआयटी देईल निधी आणि मार्गदर्शकही

निवडक नाविन्यपूर्ण कल्पना व्यावसायिक बनवण्यासाठी आयआयटी सर्व प्रकारे मदत करेल. आर्थिक मदतीसोबत, IIT इंडस्ट्री कनेक्‍ट (IIT Industry Connect), इनहाऊस लीगल आणि आयपी सपोर्ट (Inhouse Legal and IP Support), टेक्‍निकल आणि बिझनेस मेंटॉरशिप (Technical & Business Mentorship), स्टेट ऑफ आर्ट इनक्‍युबेशन फॅसिलिटी (State of Art Incubation Facility) यांसारख्या सुविधा देखील पुरवेल.

पाच वर्षांपेक्षा कमी अनुभव असलेले स्टार्टअप देखील होऊ शकतील सहभागी

'बिग के' अंतर्गत, IITs सह अभियांत्रिकी महाविद्यालये (Engineering Colleges) आणि शाळांचे विद्यार्थी देखील त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना व्यावसायिकांपर्यंत नेण्यासाठी सहभागी होऊ शकतील, जे स्टार्टअप सध्या कार्यरत आहेत. ज्यांचा अनुभव पाच वर्षांपेक्षा कमी आहे, ते देखील सहभागी होऊ शकतात. नवोदितांनाही संधी देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: राज्य सहकारी बँकेकडून विठ्ठल कारखान्याचा साखर साठा ताब्यात घेण्याची नोटीस प्रसिद्ध

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT