SBI Recruitment for graduates | Job News Updates Sakal
एज्युकेशन जॉब्स

ग्रॅज्युएट आहात? या बँकेत Direct Interview मधून मिळू शकते नोकरी

सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे.

सकाळ डिजिटल टीम

सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे.

सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे (SBI) विविध विभागांमध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर्सची भरती करण्यात येत आहे. इच्छुक उमेदवार 31 मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने www.sbi.co.in अधिकृत संकेतस्थळावर अर्ज सादर करू शकतात. चार मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकृत अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे मुख्य माहिती अधिकारी 1, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी 1 आणि उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी 2 रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. (SBI Recruitment for graduates, Job News Updates)

महत्त्वाची माहिती-

- ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सुरुवात : 4 मार्च 2022

- ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2022

येथे जाणून घ्या योग्यता -

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर या पदांवर भरती होण्यासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेशी संबंधित विषयात बॅचलर किंवा मास्टर्स डिग्री असणे आवश्यक आहे.

कशी होईल निवड -

या पदांवरील भरतीसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. सर्व पात्र उमेदवारांनी एसबीआय स्पेशालिस्ट केडर ऑफिसर रिक्रूटमेंट 2022 साठी बँकेच्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in भेट देऊन अधिसूचनेची संपूर्ण माहिती वाचणे आवश्यक आहे.

वयाची अट -

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी पदांच्या भरतीसाठी उमेदवाराचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. त्याचबरोबर इतर पदांसाठी कमाल वय 55 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. उमेदवार तपशीलवार माहितीसाठी अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT