Sakal-Vidya sakal
एज्युकेशन जॉब्स

Baramati News : बारामतीत विद्यार्थ्यांसाठी करीअर मार्गदर्शन सेमिनार; सकाळ विद्या व मोशन अँकेडमीचा उपक्रम

येत्या 23 मार्च रोजी विद्यार्थी व पालकांसाठी सकाळ विद्या व कोटाची मोशन अँकेडमी यांच्या वतीने करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला आहे.

मिलिंद संगई,

बारामती - तुम्ही दहावीची परीक्षा दिलीय… नववीतून दहावीत जाणार आहात... पुढे काय करायचं?... करियरच्या संधी काय आहेत?.... उच्च शिक्षण कुठून व कोणत्या विषयात घ्यायचे?... या तत्सम प्रश्नांची उत्तरे हव असतील आणि त्यासाठी पालकांनाही सोबत आणायची तयारी आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बारामतीत 23 मार्च रोजी मिळतील.

येत्या 23 मार्च रोजी विद्यार्थी व पालकांसाठी सकाळ विद्या व कोटाची मोशन अँकेडमी यांच्या वतीने करिअर मार्गदर्शन सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. बारामतीतील भिगवण रस्त्यावरील सिटीईन चौकातील मुक्ताई लॉन्स येथे 23 मार्च रोजी सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मध्ये ‘विज्ञान शाखेतील शिक्षण आणि करिअरच्या संधी’ याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रातील ‘जेईई’ आणि ‘नीट’ प्रवेश प्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

दहावीनंतर पुढे कोणते शिक्षण घ्यायचे., कोणती विद्या शाखा निवडायची, इंजिनिअरिंग की मेडिकलला जायचे. याबाबत शंकानिरसनासाठी ‘सकाळ विद्या’ आणि कोटाची मोशन ॲकेडमी यांच्यातर्फे ‘करिअर निवड’ विषयावर मोशन अकॅडमीचे संचालक नीरज कुमार मार्गदर्शन करणार आहेत.

काय?- कधी? केव्हा? कुठे?.......

काय?- दहावीनंतर करिअर निवड मार्गदर्शन

कधी?- शनिवार- 23 मार्च 2024

केव्हा?- सकाळी 10 वाजता

कुठे?- मुक्ताई लॉन्स, सिटी इन चौक, सूर्यनगरी, भिगवणरोड, बारामती.

प्रवेश- विद्यार्थी व पालकांसाठी विनामूल्य

आजच आपली जागा निश्चित

करा व क्युआर कोड स्कॅन करा

संपर्क -8975673310

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: आमदाराऐवजी मुलानेच दाबलं EVM चं बटण? दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होणार, जिल्हाधिकारी म्हणाले...

औरंगजेबाच्या 'या' लेकीच्या स्मरणात छत्रपती शाहूंनी बांधली खास वास्तू ; आग्रा भेटीत मोठ्या बहिणीचं योगदान

T20 WC, IND vs USA: ६ ओव्हर, ४ विकेट्स! भारताला पॉवरप्लेमध्ये अमेरिकेने दिले मोठे धक्के; अभिषेक शर्मा, शिवम दुबे पहिल्याच बॉलवर आऊट

'श्रीयुत गंगाधर टिपरे २. ०' येणार नाही... केदार शिंदेंचा धक्कादायक खुलासा; चाहत्यांचा हिरमोड करणारं मोठं कारण समोर

ZP Elections 2026 Voting Live Update : विवाह समारंभातून सोनं लंपास

SCROLL FOR NEXT