पुढील परीक्षा ऑफलाइनच! Sakal
एज्युकेशन जॉब्स

पुढील परीक्षा ऑफलाइनच! दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांचीच परीक्षा?

पुढील परीक्षा ऑफलाइनच! दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांचीच परीक्षा?

तात्या लांडगे

ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यास दोन्ही डोस न टोचलेल्यांना परीक्षेला बसू द्यायचे नाही, असा निर्णय होऊ शकतो.

सोलापूर : कोरोनाचा (Covid-19) प्रादुर्भाव एकमेकांच्या संपर्कातून वाढणार नाही, याची दक्षता टास्क फोर्सकडून घेतली जात आहे. दिवाळीनंतर (Diwali) महाविद्यालये ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. तत्पूर्वी, सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण (Vaccination) व्हावे, यादृष्टीने प्रत्येक महाविद्यालयात लसीकरण कॅम्पही आयोजिले आहेत. तरीही, लस टोचून न घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू दिले जाणार नाही, असा निर्णय होऊ शकतो, असे उच्च शिक्षण विभागातील (Department of Higher Education) विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

मार्च 2020 पासून बंद असलेली महाविद्यालये 20 ऑक्‍टोबरपासून उघडली आहेत. दुसरी लाट ओसरल्यांनतरही तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. त्यामुळे कोवॅक्‍सिन असो वा कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस टोचलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश दिला जाणार आहे. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांना 84 दिवसांनी दुसरा डोस घेतल्यावरच प्रवेश दिला जाणार आहे. तर कोवॅक्‍सिन लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस टोचणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्जावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठवून त्यांना लस टोचून घ्यावी, असे मेसेज विद्यापीठांनी पाठविले आहेत. 'मिशन यूथ हेल्थ'अंतर्गत आता विद्यापीठांसह बहुतेक महाविद्यालयांमध्ये 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांना लस टोचण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

18 वर्षांवरील प्रत्येक विद्यार्थ्याची सुरक्षितता खूप महत्त्वाची आहे. कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस टोचलेल्या विद्यार्थ्यांनाच कॉलेजमध्ये बसता येणार आहे. ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्यास दोन्ही डोस न टोचलेल्यांना परीक्षेला बसू द्यायचे नाही, असा निर्णय होऊ शकतो.

- डॉ. महेश काकडे, परीक्षा नियंत्रक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

पुढील परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन?

राज्यातील साडेपाच हजार महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची संख्या 50 लाखांपेक्षा अधिक आहे. डिसेंबरमध्ये या विद्यार्थ्यांची सत्र परीक्षा होईल. एवढ्या विद्यार्थ्यांची ऑफलाइन परीक्षा त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार नाही. कोरोनाची दुसरी लाट अजूनही पूर्णपणे संपलेली नसून बहुतेक विद्यार्थ्यांनी प्रतिबंधित लसही टोचून घेतलेली नाही. त्यामुळे पुढील सत्र परीक्षेसाठी ऑफलाइन की ऑनलाइन, या दोन्ही पर्यायांचा विचार उच्च शिक्षण मंत्रालयाकडून सुरू आहे. प्रतिबंधित लस टोचलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्या वेळची कोरोनाची स्थिती पाहून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT