Success Story  esakal
एज्युकेशन जॉब्स

Success Story : घरोघरी वृत्तपत्रे वाटली,अनाथाश्रमात राहीला अन् मिळवली लाल दिव्याची गाडी, विलक्षण जिद्द असलेल्या IAS अधिकाऱ्याची गोष्ट!

वयाच्या १० व्या वर्षी हॉटेल क्लिनरची नोकरी, अन् IAS पोस्टला घातली गवसणी

Pooja Karande-Kadam

Success Story : यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत रुजू होत देशसेवा करण्याचं अनेक युवकांचं स्वप्न असतं. यूपीएसी परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. स्वप्न साकार करण्यासाठी तरुण कठोर परिश्रम घेतात. दिवसरात्र एक करून मेहनत घेतात. ही परीक्षा उत्तीर्ण होणारे उमेदवार IAS होतात. पण आयएएस अधिकारी होणं वाटतं तितकं सोपं नाही.

आज आम्ही अशाच काही आयएएस अधिकाऱ्याची यशोगाथा सांगणार आहोत. ज्यांनी अगदी खडतर प्रसंगातून जात आयएएस अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे.  

MPSC, UPSC ची तयारी करणारे अनेक विद्यार्थी असे आहेत जे चांगल्या कुटुंबातून येतात. ज्यांना कुटुंबाचा पाठिंबा असतो. अपयश आलं तर ते पचवायला कुटुंबाची साथ असते. त्यांचे आशिर्वाद असतात. पण केरळमधील एका अधिकाऱ्याच्या वाट्याला कुटुंब कधीच नव्हत.(Success Story : motivational story in marathi ias b abdul nasar success story)

यूपीएससी उत्तीर्ण होऊन आयएएस होण्याच्या अनेक संघर्षमय कहाण्या तुम्ही ऐकल्या असतील. ज्यामुळे तुम्हालाही काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा मिळाली असावी. पण आज आम्ही तुमच्यासाठी अशा व्यक्तीची यशोगाथा घेऊन आलो आहोत, जो संघर्षाबद्दल वाचून स्वत:ला सलाम करण्यापासून रोखू शकणार नाही. (Success Story)

केरळमधील अनाथाश्रमात १३ वर्षे शिक्षण घेतलेल्या आयएएस अधिकारी अब्दुल बी नसर यांची ही कहाणी आहे. बी अब्दुल नसर यांनी वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांचे निधन केले. वडिलांच्या निधनानंतर अब्दुल आणि त्याच्या कुटुंबीयांचे जगणे अत्यंत कठीण झाले.

तो आणि त्याची भावंडं अनाथाश्रमात असताना त्याची आई घरकाम करायची. १३ वर्षे अनाथाश्रमात राहून नासरने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. (IAS Officer)

वयाच्या १० व्या वर्षी हॉटेल क्लिनरची नोकरी

अब्दुल नासर यांनी वयाच्या दहाव्या वर्षी हॉटेल क्लिनर म्हणूनही काम केले, ते अनेकदा अनाथाश्रमातून पळून गेले पण शिक्षण पूर्ण करण्यासाठी परतले. अत्यंत गरिबीतही त्यांनी बारावीचे शिक्षण पूर्ण केले आणि नंतर थलासेरीयेथील शासकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली.

१९९४ मध्ये मला पहिली नोकरी मिळाली

पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर अब्दुल नासर यांना केरळच्या आरोग्य विभागात अधिकारी म्हणून पहिली नोकरी मिळाली. पण या कामावर त्यांचे समाधान झाले नाही. २००६ मध्ये राज्य नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन ते उपजिल्हाधिकारी झाले. २०१५ मध्ये त्यांना केरळचे सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून गौरविण्यात आले होते.

२०१७ मध्ये आयएएस अधिकारी

बी अब्दुल नासर यांना २०१७ मध्ये आयएएस अधिकारी म्हणून बढती देण्यात आली होती. २०१७ मध्ये ते कोल्लम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी झाले. यापूर्वी त्यांनी सरकारमध्ये गृहनिर्माण आयुक्त म्हणूनही काम केले होते. अशा तऱ्हेने अब्दुल नासर यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर अनाथाश्रमातून आयएएसपर्यंतचा प्रवास केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT