Tech Job Cuts : ग्राहक खर्चात मंदी, जास्त व्याजदर आणि जागतिक अर्थिकविश्वात अनिश्चितता यामुळे टेक कंपन्यांनी नवीन भरतीला ब्रेक लावला आहे. अमेरिकेतल्या टेक क्षेत्रात मोठ्याप्रमाणात कर्मचारी कपात झाली असून ऑक्टोबर अखेरपर्यंत साधारण ४५ हजार कार्मचाऱ्यांना कामावरून काढलं. तर इतर कंपन्यांनी नवीन भरती गोठवली आहे.
कोणत्या मोठ्या कंपन्या किती कपात करणार जाणून घेऊया
सिगेट
सिगेट टेक्नॉलॉजिजने मागच्या महिन्यात जाहिर केलं की ते जागतिक स्तरावर ८ टक्के किंवा एकूण ३००० कर्मचारी कपात करणार आहेत.
इंटेल
साधारण ३ अब्ज डॉलर्स वाचवण्याच्या प्रत्नात इंटेल कॉर्प नोकऱ्या कमी करत आहे. शिवाय नवीन प्लांट्सवरही खर्च कमी करत आहे. हेडकाउंटमधील कपात ही कंपनीच्या ग्राहक चिप्सच्या घटत्या मागणीमुळे केला जात आहे, परिणामी पीसी मार्केट कमी होत आहे. इंटेलला CHIPS कायद्यातून कोट्यवधींचा निधी मिळणार असतानाही ही मंदी आली आहे.
मायक्रोसॉफ्ट
कॉम्प्युटरच्या विंडोज लायसन्सचा खप कमी होत असल्याने सॉफ्टवेअरमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने मायक्रोसॉफ्ट कर्मचारी कपात करत आहे. मायक्रोसॉफ्टने जुलैमध्ये 1% पेक्षा कमी कर्मचारी काढल्याचं महिन्यांनंतर सांगितलं.
ट्वीटर
ट्वीटरनेतर साधारण ५० टक्क्यांनी त्यांचे कर्मचारी कमी केले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, नवीन मालक एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या भविष्याबद्दल अनागोंदी कारभार आणि अनिश्चिततेचा एक आठवडा झाला. मस्कने ट्विट केले की जाहिरातदार माघार घेतल्याने सेवा "महसुलात मोठ्या प्रमाणात घट" झाल्यामुळे ही कपात करावी लागते.
कॉइनबेस
अमेरिकेतली कॉइनबेस कंपनीने १८ टक्के कर्मचारी कमी केले. या मंदाच्या काळात साधारण ११०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.
नेटफ्लिक्स
नेटफ्लिक्स ही पहिली अशी कंपनी आहे जिने टीव्हीला स्पर्धा देत स्वतःच स्थान निर्माण केलं आहे. पण २०२२ हे वर्ष या कंपनीसाठीपण जड आहे. या वर्षी त्यांनी दोन राऊंडमध्ये कर्मचारी कपात केली आहे. पहिल्यांदा मे मध्ये आणि नेतर जूनमध्ये. सर्व शाखा मिळून साधारण ५०० कर्मचाऱ्यांना काढलं आहे.
स्नॅप
ऑगस्ट अखेर कंपनीने २० टक्के किंवा १००० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. महसुलात मोठा फटका बसल्याने पुनर्रचना आवश्यक असल्याचं कंपनीचं म्हणंन आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.