रिझर्व्ह बॅंकेतील "हे' पद म्हणजे सर्वाधिक पगाराची सरकारी नोकरी! Gallery
एज्युकेशन जॉब्स

रिझर्व्ह बॅंकेतील 'हे' पद म्हणजे सर्वाधिक पगाराची सरकारी नोकरी!

रिझर्व्ह बॅंकेतील 'हे' पद म्हणजे सर्वाधिक पगाराची सरकारी नोकरी! जाणून घ्या सविस्तर

श्रीनिवास दुध्याल

तुम्हाला माहीत आहे का, की भारतातील सर्वोच्च पगाराची सरकारी नोकरी कुठली आहे?

सोलापूर : आज प्रत्येकाला सरकारी नोकरी (Government Job) हवी आहे. त्यासाठी सरकारी कर्मचारी भरतीची (Recruitment) जाहिरात निघाली की, वेतन किती, पद कुठले हे न पाहता सर्वच उमेदवार त्यावर तुटून पडताता. परिणामी भरावयाच्या पदांपेक्षाही कितीतरी पटींनी अर्जांचा ढीग येतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का, की भारतातील सर्वोच्च पगाराची सरकारी नोकरी कुठली आहे? तर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (Reserve Bank of India - RBI) मध्ये ग्रेड बी अधिकारी पद ही सर्वांत जास्त पगार देणाऱ्या नोकऱ्यांपैकी एक आहे.

जरी हजारो आणि लाखो उमेदवार सर्व सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करतात, परंतु जर आपण जास्तीत जास्त सुरवातीच्या पगारासह सरकारी नोकऱ्यांबद्दल बोललो तर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय) मध्ये ग्रेड बी अधिकाऱ्याची भरती त्यापैकी एक आहे. आर्थिक आणि धोरण संशोधन विभाग (DEPR), सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन विभाग (DSIM) आणि सामान्य विभाग अशा विविध विभागांमध्ये ग्रेड B च्या अधिकारी पदांसाठी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाद्वारे थेट भरती केली जाते. आरबीआयमध्ये ग्रेड बी अधिकाऱ्यांच्या पदांसाठी सुरू होणारा पगार हा भारतातील सर्वोच्च पगाराच्या सरकारी नोकऱ्यांपैकी एक मानला जातो.

किती असेल RBI ग्रेड B अधिकाऱ्याचे वेतन?

आरबीआयने 2021 मध्ये ग्रेड बी अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, विहित निवड प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 35,150 रुपये प्रारंभिक वेतन दिले जाते. याशिवाय उमेदवार महागाई भत्ता, स्थानिक भत्ता, घरभाडे भत्ता, कुटुंब भत्ता आणि श्रेणी भत्ता यासाठी देखील पात्र आहेत. अशा प्रकारे नियुक्तीनंतर उमेदवाराचे एकूण प्रारंभिक मासिक वेतन अंदाजे 83 हजार 254 म्हणजे वार्षिक 9.99 लाख आहे. आरबीआय ग्रेड बी अधिसूचना 2021 नुसार, जर बॅंकेने निवास व्यवस्था केली नाही तर मूळ वेतनाच्या 15 टक्के घरभाडे भत्ताही दिला जातो.

आरबीआय ग्रेड बी अधिकारी पदासाठी पात्रता

फक्त तेच उमेदवार रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियामध्ये ग्रेड बी अधिकारी पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत, ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून किमान 60 टक्के गुण किंवा एकूण 55 टक्के गुणांसह कोणत्याही विषयात पदवी पूर्ण केली आहे. तसेच, उमेदवाराचे वय अधिसूचनेच्या वर्षात 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. वयोमर्यादेत शिथिलता देखील आरक्षित श्रेणींना दिली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यपदाचा राजीनामा? सुप्रिया सुळेंनी दिली महत्त्वाची माहिती

Ram Shinde: हरित क्रांतीचा नवा अध्याय : विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, १८७६ दुर्मिळ देशी वृक्षांची लागवड

Pune News: राज्यात धरणसाठा ६० टक्क्यांवर; पुणे विभागात मुबलक पाणी, जोरदार पावसाने काही भागांत पूरस्थिती

Kolhapur : कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी शासनाची पुढची स्टेप, पालकमंत्री आबिटकरांनी कायदेशीर त्रुटी दूर करण्यावर दिला भर

संतापजनक! आळंदीत वारकरी संस्थेत तरुणीवर बलात्कार, किर्तनकार महिलेसह कुटुंबातील ५ जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT