Career Planning Tips esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Planning Tips : करिअर प्लॅनिंग करताय? मग ‘या’ टिप्सची घ्या मदत

चांगले करिअर घडवण्यासाठी त्यात सातत्याने होणारे बदल स्विकारणे महत्वाचे असते.

Monika Lonkar –Kumbhar

Career Planning Tips : करिअरमध्ये अनेक जण यशस्वी होतात, त्यांना चांगली नोकरी मिळते. परंतु, नोकरी मिळाली म्हणजे करिअर झाले का ? तर याचे उत्तर नाही असे आहे. कारण, फक्त नोकरी मिळवणे म्हणजे करिअर नाही तर ती नोकरी करत असताना तुमच्या करिअरला चांगला आकार देणे महत्वाचे आहे.

नोकरी करत असताना तुम्ही तुमच्या करिअरला आकार कसा देताय ? आणि तुम्ही त्यात टिकून कसे राहता ? हे महत्वाचे असते. यासाठी तुम्ही करिअरचे प्लॅनिंग आणि योग्य नियोजन करणे आवश्यक असते आणि प्रत्येकालाच ते जमते असे नाही.

करिअर चांगले घडवण्यासाठी त्यात सातत्याने होणारे बदल स्विकारणे आणि त्या प्रमाणे स्वत:ला घडवणे महत्वाचे असते. यासाठी करिअर प्लनिंगची खूप मदत होते. आज आपण करिअर प्लॅनिंगच्या काही टिप्स जाणून घेणार आहोत.

स्वत: ला समजून घ्या

करिअरचे प्लॅनिंग करताना सर्वात आधी स्वत:ला समजून घेणे महत्वाचे आहे. तुमचा स्वत:चा फोकस क्लिअर असणे आणि तुम्हाला नेमकं कस काम हवं आहे ? ते माहित असणं महत्वाचे असणे.

करिअरचे प्लॅनिंग करताना स्वत:ला वेळ देणे अतिशय महत्वाचे आहे. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्याची एक लिस्ट बनवा आणि ज्या गोष्टी करायच्या नाहीत, त्याची सुद्धा एक यादी बनवा. यामुळे तुमचा गोल सेट होण्यास मदत होईल.

जॉब मार्केट आणि इंडस्ट्री

करिअरचे प्लॅनिंग करताना तुम्हाला जॉब मार्केट आणि इंडस्ट्रीबद्दल माहित असणे आवश्यक आहे. कोणत्याही क्षेत्रात तुम्ही करिअर करत असाल तरी सुद्धा त्या फिल्डचे जॉब मार्केट काय आहे ? आणि इंडस्ट्री कशी आहे ? यावर तुमचा अभ्यास असायला हवा. यामुळे तुम्हाला जॉब मिळवण्यासाठी फायदा मिळू शकेल.

अनेकदा काय होतं की, काही जण इतरांना पाहून त्यांच्या करिअरची वाट निवडतात जे की अतिशय चुकीचे आहे. कारण, भविष्यात मग त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे, करिअरचे योग्य आणि अचूक नियोजन असणे महत्वाचे आहे. हे नियोजन करताना चुका शक्यतो टाळा.

शिकत राहणे महत्वाचे

करिअर करताना आणि करिअर केल्यानंतर ही शिकण्याची प्रोसेस कधी थांबत नाही. त्यामुळे, शिकत राहणे हे अतिशय महत्वाचे आहे. आज कोणत्याही फिल्डचा विचार केला तरी असे दिसून येते की, त्या फिल्डमध्ये सातत्याने बदल होत आहेत आणि पुढे ही यामध्ये बदल होत राहणार. त्यामुळे, त्याच्याशी निगडीत गोष्टी, नवीन स्किल्स शिकत राहणे हे महत्वाचे आहे. या गोष्टी शिकल्या तर तुम्ही त्या फिल्डमध्ये टिकू शकालं.

थोडक्यात जॉबसाठी आणि करिअरची उंची वाढवण्यासाठी तुम्ही त्या विषयाशी निगडीत असलेली कौशल्ये शिकत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे, शिकणं हे कधीच थांबवू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Vidarbha News: भरधाव दुचाकीच्या अपघातात तरुण जागीच ठार; जाम महामार्गावर नियंत्रण सुटल्यामुळे दुचाकीने वाहनाला धडक

SCROLL FOR NEXT