barti organisation
barti organisation Sakal
एज्युकेशन जॉब्स

‘बार्टी’मार्फत यूपीएससीच्या पूर्वतयारीसाठी तीनशे विद्यार्थांना मिळणार प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वतयारीसाठी दिल्ली येथे अनुसूचित जातीतील दोनशे उमेदवारांना मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येते.

पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) पूर्वतयारीसाठी दिल्ली येथे अनुसूचित जातीतील दोनशे उमेदवारांना मोफत विशेष प्रशिक्षण देण्यात येते. परंतु आता त्यामध्ये शंभरने वाढ करून आता २०२२-२३ या वर्षापासून एकूण तीनशे उमेदवारांना हे प्रशिक्षण देण्याचा निर्णय सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर ‘बार्टी’मार्फत विशेष चाचणी परीक्षा घेऊन यूपीएससी परीक्षेची पूर्वतयारी करणाऱ्या तीनशे  विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणासाठी निवडले जाणार आहे.

दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेस देण्यात येणारे संपूर्ण प्रशिक्षण शुल्क, विद्यार्थ्यांना उपस्थितीनुसार विद्यावेतन दरमहा दोन हजार रुपये दिले जाते. याशिवाय पहिल्या महिन्यातील आर्थिक साहाय्य तीन हजार रुपये आणि सुरवातीच्या दिल्ली येथील प्रवासाकरिता पाच हजार रुपये व प्रशिक्षण संपल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी पाच हजार रुपये प्रवास भत्ता विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीतील इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी ‘https://barti.in’ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT