Zilla Parishad Primary Teacher Recruitment
Zilla Parishad Primary Teacher Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

Teacher Recruitment : शिक्षक यादी लवकरच पवित्र पोर्टलवर; प्राथमिकची 'इतकी' रिक्त पदे भरली जाणार

सकाळ डिजिटल टीम

या भरतीमध्ये जिल्हा परिषदेला एकूण जागांपैकी ७० टक्के रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

रत्नागिरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरतीप्रक्रिया (Zilla Parishad Primary Teacher Recruitment) अंतिम टप्प्यात आली असून, पुढील आठवड्यात शिक्षकांची यादी पवित्र पोर्टलवर जाहीर होईल. त्यामुळे जिल्ह्याला नवीन शैक्षणिक वर्षात १ हजार ५६६ शिक्षक नव्याने मिळणार आहेत. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवड झालेल्या शिक्षकांची कागदपत्रे तपासण्यात येतील आणि त्यानंतर समुपदेशानाने रिक्त शाळांवर नियुक्ती केली जाईल.

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. पवित्र पोर्टलवर (Pavitra Portal 2024) अंतिम टप्प्यातील माहिती भरण्यासाठी उमेदवारांना १४ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. ती पूर्ण झाली आहे. पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता असल्यामुळे शिक्षक भरतीची (Teacher Recruitment) प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जात आहेत.

पवित्र पोर्टलवर नावे नोंदवलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिनला नियुक्तीची माहिती पाठवली जाणार आहे. ही प्रक्रिया येत्या आठवडाभरात होईल, अशी शक्यता जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत.

शासनाच्या आदेशानुसार, या भरतीमध्ये जिल्हा परिषदेला एकूण जागांपैकी ७० टक्के रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये १ हजार ४५१ मराठी माध्यमाची आणि ११५ ऊर्दू माध्यमाची पदे रिक्त आहेत. पोर्टलवर नियुक्तीची यादी जाहीर केल्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर समुपदेशनाने संबंधित शिक्षकांना रिक्त शाळांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.

जिल्ह्यात ७२७ कंत्राटी शिक्षक

शिक्षकांची पदे रिक्त असल्यामुळे गावातीलच बीएड, डीएड झालेल्या तरुणांना नऊ हजार रुपये मानधनावर शाळेत नियुक्त्या दिल्या होत्या. जिल्ह्यात सव्वासातशे शिक्षक कार्यरत आहेत. कायमस्वरूपी शिक्षक नियुक्त झाल्यानंतर कंत्राटी शिक्षकांची नोकरी संपुष्टात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: उद्या महाराष्ट्रात बारावीचा निकाल जाहीर होणार

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT