Self-employment 
एज्युकेशन जॉब्स

स्वयंरोजगाराच्या दिशेने

प्रा. डॉ. गिरीश देसाई

अनेक वर्षांपासून उद्योग आणि अभियांत्रिकी शिक्षण संस्था यांच्यातील अपुऱ्या समन्वयामुळे उद्योग जगताला व सरकारी-निमसरकारी आस्थापनांना अभिप्रेत असणारे मनुष्यबळ मिळत नाही. उद्योगक्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या मुलांना त्यांच्या प्रकल्पामध्ये सामावून घेऊ शकतात किंवा प्रत्यक्ष काम करायचा अनुभव गाठीशी असल्यानंतर उद्योग करण्यासाठी आवश्‍यक ती कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित होतात व असे विद्यार्थी स्वयंरोजगाराचा मार्गही आत्मविश्वासाने चोखाळू शकतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अभियांत्रिकी शिक्षणातील समस्या या बहुपेडी आहेत. याचा शोध घेण्याबरोबरच मुळात ते अभ्यासक्रम शिकवायची पद्धत किती योग्य आहे, याचाही विचार करणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्यक्ष शैक्षणिक संस्थेने खालील गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे.  

१. उद्योग संघटना सदस्यता - असोसिएशनच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग व मजबूत नेटवर्क तयार करणे
२. विद्यार्थीभिमुख उपक्रम - इंटर्नशिप-नोकरीवरील थेट प्रशिक्षण, प्रकल्प,औद्योगिक भेट
३. प्राध्यापकभिमुख उपक्रम - उद्योगातील विद्याशाखा प्रशिक्षण/एफडीपी, स्त्रोत व्यक्ती अनुसंधान आणि विकास, पेटंट, अनुभवी सल्लागार मंडळ
४. उद्योग संस्थांमधील परस्परसंवाद सेल - सीडीसी / डीडीसी / उद्योगसदस्य रजिस्ट्रेशन, अभ्यासक्रम डिझाईन, वेबिनार सेमिनार
५. उद्योगाच्या दिशेने - शिक्षणामधील पदवीबदल, मूलभूत अभ्यासक्रम (बी. वोक कोर्सेस) व त्यासाठी उद्योगांना पायाभूत सुविधा पुरविण्याचे काम शैक्षणिक संस्थांनी केले पाहिजे.
६. संशोधन आणि विकास उद्योजकता - संशोधन प्रस्ताव/सीएसआर निधी व त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान हस्तांतरण, उद्योगांपासून संस्थांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. स्टार्ट-अप्स आणि उद्योजक तयार करण्यासाठी सामंजस्य व सहउद्योग करार करणे गरजेचे आहे.
७. प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य इंटर्नशिप आणि नोकरीवर प्रशिक्षण हाही महत्त्वाचा भाग आहे. 

अपेक्षित बदल
थिअरीवर भर देणारे अभ्यासक्रम पूर्णपणे रद्द करून त्यांना रस वाटेल असे प्रोजेक्‍ट बेस्ड एज्युकेशन, अनुभवावर आधारित शिक्षण आणि परिस्थितीवर आधारित परीक्षा अशी त्रिसूत्री अभियांत्रिकी शिक्षणपद्धतीत राबवणे गरजेचे आहे. 

'इंडस्ट्री इंटरॅक्‍शन’कक्षाची गरज
प्रत्येक संस्थेने ‘इंडस्ट्री इंटरॅक्‍शन’ नावाचा स्वतंत्र कक्ष निर्माण केला पाहिजे. इंजिनिअरिंग कॉलेजातील शिक्षकाला वर्षाचा तरी औद्योगिक अनुभव असणे जरुरीचे आहे. खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांत जर विद्यार्थी किंवा प्राध्यापक समाजाच्या कामी येणारे संशोधन करीत असतील, तर सरकारी आणि खासगी असा भेदाभेद न करता, त्यासंशोधन प्रकल्पाचा अहवाल अभ्यासून त्यासाठीचा निधी द्यायला हवा. विविध उद्योगांकडून कामे घेऊन ते प्रकल्प त्या महाविद्यालयात राबवले जातात. संशोधन हा शिक्षण संस्थेचा गाभा आहे, हे ध्येय ठेवून शिक्षणक्षेत्रात परिवर्तन करून शिक्षण क्षेत्रात प्रगती करण्यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेने कटिबद्ध असणे गरजेचे आहे.
- प्रा. डॉ. गिरीश देसाई, कार्यकारी संचालक, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आहे काय? तुम्ही आमच्या पैशावर जगताय; भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान

Bus Accident : समोरून आलेल्या कारला वाचवताना बसचा भीषण अपघात; 8 जण जागीच ठार, 32 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

Mahadev Munde Case: परळी येथील महादेव मुंडे खूनप्रकरणी विजयसिंह बांगरचा जबाब नोंदविला

SCROLL FOR NEXT