CUET For UG Admission Central University
CUET For UG Admission Central University e sakal
एज्युकेशन जॉब्स

UGC चा मोठा निर्णय! १२ वी च्या गुणांवरून केंद्रीय विद्यापीठात होणार नाही प्रवेश

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये (Central University Admission) पदवीला प्रवेश घेताना बारावीला बोर्डात मिळालेल्या गुणांचा फायदा होणार नाही. प्रवेशासाठी किमान गुणांची अट आहे. मात्र, सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेशासाठी आता प्राधान्य दिले जाणार नाही. कारण, युजीसी (UGC) आता सर्व केंद्रीय विद्यापीठांसाठी एकच प्रवेश परीक्षा (CUET) आयोजित करत आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांनाच जेएनयूसह बीएचयू यासारख्या केंद्रीय विद्यापीठात पदवीसाठी प्रवेश मिळेल. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने घोषणा केली.

केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश फक्त कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे दिला जाईल. देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठांसाठी सर्वांसाठी समान परीक्षा घेतली जाणार आहे. यापूर्वी बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जात होता. त्यामुळे राज्य मंडळे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देशातील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे कठीण होते, असं युजीसीकडून सांगण्यात आलं आहे.

या वर्षीपासून जुलैमध्ये परीक्षा -

यूजीसीने म्हटले आहे की, 2022-23 सत्रापासूनच सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवीसाठी प्रवेश मिळेल. केंद्रीय विद्यापीठांना त्यांच्या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी बोर्ड परीक्षेत मिळालेली किमान टक्केवारी ठरविण्याचा अधिकार असेल. म्हणजेच कमी टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांना आम्ही बारावीमध्ये प्रवेश देणार नाही, असा निर्णय विद्यापीठ घेऊ शकते. मात्र, त्यानंतरही त्याला CUET द्यावी लागणार आहे. ऑडिओ-व्हिज्युअल किंवा परफॉर्मिंग आर्ट्स आणि क्रीडा श्रेणींमध्ये प्रवेशासाठी विद्यापीठ प्रात्यक्षिक घेऊ शकते.

12वी NCERT अभ्यासक्रमाच्या आधारावर -

UGC ने या प्रवेश परीक्षेच्या नावातून सेंट्रल युनिव्हर्सिटी हा शब्द काढून टाकला आहे जेणेकरून डीम्ड किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला हवे असेल तर ते यामध्ये सहभागी होऊ शकतात. या परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांच्या संस्थांमध्ये प्रवेश देऊ शकतात. ही परीक्षा ऑनलाइन होणार असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहे. त्याचा अभ्यासक्रम बारावीच्या NCERT वर आधारित असेल.

देशातील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल -

विद्यापीठातील प्रवेशासाठी एनसीईआरटीचा अभ्याक्रम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी एकाच पद्धतीने तयारी करू शकतात. सामायिक प्रवेश परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळेल. दुर्गम भागातील एखाद्या विद्यार्थ्याने बोर्डाची परीक्षा दिली तरी त्या विद्यार्थ्याला संधी मिळेल. या परीक्षेमुळे पालकांचा आर्थिक भारही कमी होणार आहे. देशातील खासगी आणि सरकारी सर्व विद्यापीठे या सामायिक परीक्षेसाठी युजीसीमध्ये नोंदणी करू शकतात.

अशी होईल परीक्षा -

जगदीश कुमार यांनी सांगितले की, परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाईल. पहिल्या टप्प्यात अनिवार्य भाषा परीक्षा, दोन दिलेले विषय आणि एक सामान्य चाचणी असेल. दुसऱ्या टप्प्यात चार विषय आणि एक भाषा परीक्षा असेल. ही भाषा विद्यार्थ्यांनी निवडलेल्या 19 भाषांपैकी एक असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT